वेड लागेल ! अंबरनाथ, बदलापूर पॅटर्न राज्यात कुठे कुठे?
By अतुल कुलकर्णी | Updated: January 12, 2026 12:12 IST2026-01-12T11:41:03+5:302026-01-12T12:12:01+5:30
अंबरनाथ नगरपालिकेचे विदारक वास्तव

वेड लागेल ! अंबरनाथ, बदलापूर पॅटर्न राज्यात कुठे कुठे?
अतुल कुलकर्णी
आपण या उमेदवाराला मत दिले, आपल्या आमतामुळे तो निवडून आला. याचा आनंद मतदारांनी घेण्याआधीच निवडून आलेल्या १२ उमेदवारांनी हजारो मतदारांचा घोर अपमान केला आहे. तुम्ही मतदान केले. तुमचे काम संपले. आता आम्ही कसेही वागू आम्हाला कोण विचारणार? या वृत्तीने काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या १२ नगरसेवकांनी आधी वेगळा गट केला. नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. २१ तारखेला निकाल लागल्यापासून शनिवारच्या संध्याकाळपर्यंत काय काय घडले ते इथे क्रमवार दिले आहे. कोणत्याही सामान्य माणसाला चक्रावून टाकणारा आणि अक्षरशः वेड लागेल अशा स्थितीत नेऊन ठेवणारा हा घटनाक्रम आहे. मतदानाच्या वेळी विशिष्ट पक्षाच्या नावाने मत मागायचे. त्या पक्षाची भूमिका घसा कोरडा होईपर्यंत मांडायची. निवडून आले की त्या भूमिकांचे गाठोडे गुंडाळून फेकून द्यायचे आणि स्वतःचाच बाजार स्वतः मांडायचा यासारखे थक्क करणारे वास्तव दुसरे असू शकत नाही. आपण नेमकी कोणती भूमिका घेत आहोत? कशा पद्धतीचे राजकारण करत आहोत? सत्तेशिवाय आपण राहूच शकत नाही का? अशा प्रश्नांची उत्तरे या सगळ्या राजकीय पक्षांच्या लेखी गौण आहेत. विरोधात आणि सत्तेत, दोन्ही जागी आम्हीच अशी वृत्ती ठेवायची. मतदारांना कवडीमोल किंमत देत वाटेल तसे वागणारे हे नगरसेवक कुठल्याही शिक्षेला पात्र होऊ शकत नाहीत. त्यामुळे जे काही घडत आहे ते असहायपणे पाहण्याशिवाय मतदारांच्या हातात काहीही उरलेले नाही.
अंबरनाथमध्ये २१ डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतरच हे सगळे घडले असे नाही. याची सुरुवात खूप आधीपासून होत होती. काँग्रेसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील काँग्रेसमध्ये होते. लोकसभेची जागा शिंदेसेना लढणार हे लक्षात आल्यानंतर ते शिंदेसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत गेले. विधानसभेलाही त्यांनी शिंदेसेनेचा प्रचार केला. त्यामुळे त्या काळात काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षातून निलंबित केले होते. नगरपरिषदेच्या निवडणुका आल्या तेव्हा हेच प्रदीप पाटील आपले निलंबन रद्द करावे म्हणून प्रयत्न करत होते. नव्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे निलंबन रद्द तर केलेच, शिवाय अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर दिली. असे करू नका म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे आणि तालुकाध्यक्ष कृष्णा रसाळ प्रदेशाध्यक्षांना सांगत होते; मात्र त्यांचे न ऐकता सगळी जबाबदारी प्रदीप पाटील यांच्यावर देण्यात आली. परिणामी रसाळ आणि चोरगे काँग्रेसचा राजीनामा देऊन घरी बसले.

हे बारा लोक काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. काँग्रेसला मानणाऱ्या लोकांनी त्यांना मतदान केले होते. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन भाजपने काय साध्य रोजी केले..? निवडणुकीच्या आधी मतदारांना अंधारात ठेवून एकमेकांशी साटेलोटे करायचे. निवडून आल्यानंतर कोणीही कोणासोबतही युती आणि आघाड्या करायच्या हा नवा राजकीय ट्रेंड महाराष्ट्रात रुजला आहे.
आपल्या भागाचा विकास करण्याच्या नावाखाली स्वतःचा विकास करून घ्यायचा हे उघड सत्य आहे. मागच्या निवडणुकीत नगरसेवक असणाऱ्या अनेकांच्या संपत्तीमध्ये यावेळी कित्येक पटीने वाढ झाली आहे. त्यांनी अशी काय जादू केली यजादूक ज्यामुळे अनेकांची संपत्ती १०० पटीने वाढली? ती जादू सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला हे नगरसेवक का शिकवत नाहीत? म्हणजे मध्यमवर्गीय माणूसही स्वतःच्या संपत्तीत अशी वाढ करू शकेल. या विषयावर खरे तर निवडून येणाऱ्या नगरसेवकांनी क्लासेस सुरू करायला हवेत.
महापालिकेतही तिथल्या स्थानिक भाजप नेत्यांनी जे केले त्यामुळे भाजपचीच प्रतिमा मलीन झाली. बदलापूर शहरात ऑगस्ट २०२४ मध्ये एका नामांकित शाळेतल्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. घटना कळाल्यानंतर शाळा प्रशासनातील अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात तत्कालीन सचिव तुषार आपटेला पोलिसांनी अटक केली होती. त्यांना दोनच दिवसात एकूण : ३२ एकूण: ५९ जामीनही मिळाला होता. या प्रकरणातील आरोप अक्षय शिंदेचे पोलिसांनी एन्काऊंटर केले होते. याच् प्रकरणात जामिनावर सुटून आलेल्या तुषार आपटेंन भाजपने बदलापूर नगरपरिषदेमध्ये स्वीकृत सदस्यत्व दिले. अत्याचार झालेल्या चिमुकलीच्या पालकांर्न केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणे, घटनेची माहित तत्काळ पोलिसांना न देता ते प्रकरण लपवण्याच प्रयत्न करणे आणि अत्याचार करणाऱ्या आरोपील कामावर ठेवताना त्याची कोणतीही चौकशी न करणे असे गंभीर आरोप तुषार आपटेवर होते. हे माहिर्त असूनही बदलापूरच्या भाजप नेत्यांनी आपटेंन स्वीकृत नगरसेवकपद दिले.
चौफेर टीका झाल्यानंतर आपटेंनी सदस्यत्वाच राजीनामा दिला. आपल्यामुळे आमची शैक्षणिक संस्था आणि भाजपला कोणताही त्रास होऊ नये म्हणून आपण राजीनामा स्वखुशीने देत असल्याचे आपटे यांनी माध्यमांना सांगितले. वाटेल तस् वागायचे आणि नंतर पक्ष आणि आपली संस्थ बदनाम होऊ नये म्हणून आपण राजीनामा देत आहोत, अशी शहाजोगपणाची भूमिका घ्यायची शिवाय ही भूमिका लोक मान्य करतील असेही गृहीत धरायचे. हे जास्त भयंकर आहे. बदलापूर, अंबरनाथच हा पॅटर्न महापालिकेच्या निकालानंतर किती आणि कशा पद्धतीने वाढेल यावर महाराष्ट्राचे पुढचं सुसंस्कृत राजकारण टिकून असेल...