जसा बॉस तसा कार्यकर्ता; श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह वैशाली दरेकरांवर टीका

By मुरलीधर भवार | Published: April 12, 2024 04:10 PM2024-04-12T16:10:52+5:302024-04-12T16:11:01+5:30

अंबरनाथ येथे प्रचारादरम्यान उद्धव सेनेच्या उमेदवार दरेकर यांनी खासदार शिंदे यांची मिमिक्री करत टीका केली होती . या टीकेला खासदार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले.

shrikant shinde criticizes uddhav thackeray aaditya thackeray along with vaishali darekar | जसा बॉस तसा कार्यकर्ता; श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह वैशाली दरेकरांवर टीका

जसा बॉस तसा कार्यकर्ता; श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह वैशाली दरेकरांवर टीका

मुरलीधर भवार, कल्याण- जसा बॉस तसा कार्यकर्ता अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव सेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यावर आहे.

अंबरनाथ येथे प्रचारादरम्यान उद्धव सेनेच्या उमेदवार दरेकर यांनी खासदार शिंदे यांची मिमिक्री करत टीका केली होती . या टीकेला खासदार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी खासदार शिंदे यांनी मी त्यांची चूक मानत नाही. त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. जसा बॉस असतो ,जसा बॉस शिकवतो तसे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावे लागते. त्यांच्याकडे आता तेच काम धंदे आहेत. प्रत्येक सभेत मेमिक्री करण्याचे सुरू ठेवलेले आहे. मला वाटते हे इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे उरणार असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असल्या तरी महायुतीच्या काही ठिकाणच्या जागा वाटपाचा तिढा सुटलेला ाही. त्यावर खासदार शिंदे यांनी महायुतीतील जागेचा तिढा जास्त राहिलेला नाही, दोन दिवसात सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. येत्या दोन दिवसात भाजपा ,शिवसेना ,राष्ट्रवादी यांच्या जागा जाहीर होतील, राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा महायुती जिंकणार आणि पुन्हा एकदा मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल असा दावा खासदार शिंदे यांनी केला आहे.

Web Title: shrikant shinde criticizes uddhav thackeray aaditya thackeray along with vaishali darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.