उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रवींद्र चव्हाण निवासस्थानी भेट

By अनिकेत घमंडी | Updated: May 2, 2024 17:50 IST2024-05-02T17:49:31+5:302024-05-02T17:50:54+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी १०: ३० वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चव्हाण कुटुंबियांशी हितगुज केली.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis visit at Ravindra Chavan residence | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रवींद्र चव्हाण निवासस्थानी भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रवींद्र चव्हाण निवासस्थानी भेट

डोंबिवली - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या कल्याणचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी अर्जासाठी गुरुवारी डोंबिवलीत आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यायला काहीसा वेळ लागणार होता, त्यामुळे फडणवीस यांनी सकाळी १०: ३० वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पलावा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन चव्हाण कुटुंबियांशी हितगुज केली.

चव्हाण यांनी स्वतः काही फोटो आणि संदर्भ सोशल मीडियावर शेअर केला. चव्हाण यांची मोठी मुलगी राणी ही मेडिकलच्या शेवटच्या वर्षात असून त्या संदर्भात फडणवीस यांनी तिची विचारपूस केली, तसेच लहान मुलगी देखील मेडिकलला असल्याने तिचीही विचारपूस केली. काही विषयांवर चव्हाण यांच्याशी चर्चा करून नंतर ते महायुतीच्या रॅलीत दाखल झाले.

ठाणे भाजपला हवे होते, त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा असतानाच फडणवीस आणि चव्हाण यांची डोंबिवलीत येऊन काही वेळ चर्चा झाली त्यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती, परंतु ती केवळ कौटुंबिक भेट होती असे सांगून चव्हाण यांनी महायुतीच्या रॅलीला जाऊ या असे म्हंटल्यावर माध्यमात एकच हशा पिकला.

Web Title: Deputy Chief Minister Devendra Fadnavis visit at Ravindra Chavan residence