शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 06:40 IST2026-01-15T06:37:38+5:302026-01-15T06:40:39+5:30

शिंदेसेनेच्या उमेदवारांना अटक करण्याची मागणी भाजपने केली होती. 

commotion erupted in Dombivli after two candidates were arrested at a hospital | शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी

शिंदेसेनेच्या दोन उमेदवारांना रुग्णालयातच अटक केल्यावरून उडाला गोंधळ, भाजपने केली होती मागणी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पॅनल क्रमांक २९ मध्ये पैसे वाटपाच्या कारणावरून भाजप आणि शिंदेसेनेत झालेल्या हाणामारीच्या घटनेतील आरोपी असलेल्या दोघा उमेदवारांना पोलिसांनी रुग्णालयातून अटक केल्याने रुग्णालयात गोंधळ उडाला. शिंदेसेनेच्या उमेदवारांना अटक करण्याची मागणी भाजपने केली होती. 

पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिंदेसेनेची युती आहे. मात्र, पॅनल क्रमांक २९ मध्ये भाजप आणि शिंदेसेनेचे उमेदवार रविवारी आमनेसामने आले. भाजपचे पदाधिकारी पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेसेनेच्या उमेदवाराने केला. तो भाजपने फेटाळून लावला होता. त्यानंतर पुन्हा सोमवारच्या रात्री भाजप उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर प्रचार आटोपून घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

भाजप आणि शिंदेसेनेत हाणामारी झाली. रामनगर पोलिसांनी शिंदेसेनेचे उमेद्वार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भाजपने शिंदेसेनेच्या उमेदवारांना अटक करण्याची मागणी करीत मूक मोर्चा काढला होता. मात्र, शिंदेसेनेचे उमेदवार रती पाटील, नितीन पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिस रवी पाटील आणि नितीन पाटील यांना अटक करण्यासाठी मंगळवारी रात्री रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नितीन पाटील आणि रवी पाटील यांना अटक करण्यात येऊ नये, या मागणीसाठी शिंदेसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाण्यातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.
 

Web Title : चुनाव हिंसा के बाद अस्पताल से दो उम्मीदवारों की गिरफ्तारी से हंगामा

Web Summary : चुनाव के दौरान कथित धन वितरण को लेकर झड़पों के बाद, पुलिस ने दो उम्मीदवारों को अस्पताल से गिरफ्तार कर लिया, जिससे हंगामा मच गया। बाद में दोनों को बिगड़ती हालत के कारण सरकारी अस्पताल में स्थानांतरित कर दिया गया।

Web Title : Chaos as Two Candidates Arrested from Hospital After Election Violence

Web Summary : Following clashes over alleged money distribution during elections, police arrested two candidates from the hospital, leading to uproar. Both were later moved to a government hospital due to their deteriorating health.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.