भिवंडी-निजामपूर: काँग्रेसला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 07:42 IST2026-01-17T07:41:39+5:302026-01-17T07:42:12+5:30

भिवंडीत समाजवादी पार्टीला जेमतेम यश लाभले.

Bhiwandi Nizampur Municipal Corporation Election result SP Loss Becomes Congress and NCP Gain | भिवंडी-निजामपूर: काँग्रेसला फायदा

भिवंडी-निजामपूर: काँग्रेसला फायदा

भिवंडी : भिवंडी महापालिकेत काँग्रेसची प्रकृती तोळामासा दिसत होती. मात्र समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी व आ. रईस शेख यांच्यातील संघर्ष निवडणुकीच्या तोंडावर पेटला. आझमी यांनी शेख यांचे उमेदवार कापल्यामुळे शेख यांनी आपल्या समर्थकांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवून दिल्याने काँग्रेसच्या कुडीत प्राण फुंकला गेला. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षालाही या वादाचा बराच फायदा झाला. समाजवादी पार्टीला जेमतेम यश लाभले.

भांडणाचा लाभ

काँग्रेसला पक्षाला मागीलवेळी मोठे यश मिळाले होते. यावेळी काँग्रेसची अवस्था दारुण होती; परंतु समाजवादी पक्षातील भांडणाचा लाभकाँग्रेसला झाला. सहा नगरसेवक बिनविरोध विजयी करणाऱ्या भाजपने चांगल्या जागा निवडून आणल्या. वाढलेली ताकद हा भाजपला दिलासा आहे.

भाजप २२ 
शिंदेसेना १२ 
काँग्रेस ३० 
राष्ट्रवादी अजित पवार 0
राष्ट्रवादी शरद पवार १२ 
मनसे 0
उद्धवसेना 0
कोणार्क विकास आघाडी ४ 
समाजवादी पक्ष ७
इतर 3

Web Title : भिवंडी-निजामपुर: समाजवादी पार्टी के संघर्ष से कांग्रेस को फायदा

Web Summary : समाजवादी पार्टी में आंतरिक कलह से भिवंडी-निजामपुर में कांग्रेस को फायदा हुआ, जिससे नगर निगम में उनकी उपस्थिति बढ़ी। भाजपा को भी लाभ हुआ। कांग्रेस को 30 सीटें मिलीं, जबकि भाजपा को 22।

Web Title : Bhiwandi-Nizampur: Congress Gains Advantage from Samajwadi Party Conflict

Web Summary : Internal strife in the Samajwadi Party benefited Congress in Bhiwandi-Nizampur, boosting their presence in the municipal corporation. BJP also saw gains. Congress secured 30 seats, while BJP got 22.