कल्याण लोकसभा मतदार संघातून ४ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, ३० उमेदवारी अर्ज वैध

By मुरलीधर भवार | Published: May 4, 2024 03:29 PM2024-05-04T15:29:00+5:302024-05-04T15:30:01+5:30

श्रीकांत शिंदे हे महायुतीतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. त्यांच्या विरोधात मविआच्या उमेदवार वैशाली दरेकर या निवडणूक लढवित आहेत. त्याचबरोबर ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Applications of 4 independent candidates from Kalyan Lok Sabha Constituency rejected | कल्याण लोकसभा मतदार संघातून ४ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, ३० उमेदवारी अर्ज वैध

कल्याण लोकसभा मतदार संघातून ४ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, ३० उमेदवारी अर्ज वैध

 कल्याण-कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेनंतर ३४ पैकी ४ अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहे. ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

या मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे महायुतीतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढवित आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर या निवडणूक लढवित आहेत. त्याचबरोबर ‘बिग बॉस फेम’ अभिजीत बिचकुले यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय बसपा, वंचित आणि एमआयएम या पक्षाचे उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ६ मे राेजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. ६ मे रोजी ३० पैकी किती उमेदवार माघार घेतात. त्यावरुन प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची संख्या कळणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेनंतर बाद ठरलेल्या अपक्ष उमेदवारांमध्ये हबीबुर रेहमान खान, जमिला इरफान शेख , काशिनाथ विठ्ठल नारायणकर आणि अश्फाक अली सिद्धिकी यांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.

Web Title: Applications of 4 independent candidates from Kalyan Lok Sabha Constituency rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.