कल्याण लोकसभेत ५३ हजार २८२ मतदार वाढले

By अनिकेत घमंडी | Published: March 19, 2024 06:10 PM2024-03-19T18:10:41+5:302024-03-19T18:11:32+5:30

लोकसभेत अंबरनाथ, उल्हसनगर, कल्याण पूर्व, कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

53 thousand 282 voters increased in Kalyan Lok Sabha | कल्याण लोकसभेत ५३ हजार २८२ मतदार वाढले

कल्याण लोकसभेत ५३ हजार २८२ मतदार वाढले

डोंबिवली: कल्याण लोकसभा निवडणुकीचे मतदान २० मे रोजी असून त्या मतदानाला सुमारे २० लाख १८ हजार९५८ मतदारांना त्यांचा।हक्क बजावता येणार आहे. 

२०१९ मध्ये संपन्न झालेल्या निवडणूकीपेक्षा यंदा या लोकसभा क्षेत्रात ५३ हजार २८२ मतदारांची भर पडली आहे. २०१९ मध्ये १९ लाख ६५ हजार ६७६ एकूण मतदार होते. या लोकसभेमध्ये २२ हजार १७९ युवा मतदारांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. १० लाख ८५ हजार ७१० पुरुष मतदार, ९ लाख ३२ हजार ५१० महिला, ७३८ इतर अशी मतदारांची विभागणी आहे. ५६५ सैनिक, १८ वर्षे पूर्ण केलेले २२ हजार १७९, २० ते २९ वयोगटातले ३ लाख ११ हजार ६९४, दिव्यांग १० हजार ८०२, पंच्याईंशी पेक्षा जास्त वय असलेले १८ हजार १७९ मतदारांचा त्यात समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

प्रति हजारी पुरुषांच्या तुलनेत या लोकसभेत ८५९ महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. यालोकसभेमधील निवडणूक विषयक नियोजनाची माहिती देण्यासाठी त्यांनी संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलात मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या लोकसभेत अंबरनाथ, उल्हसनगर, कल्याण पूर्व, कल्याण डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा मुंब्रा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. महिलांसाठी पिंक मतदान केंद्र यंदाही असणार असून जास्तित जास्त महिलांनी मतदान करावे यासाठी त्या केंद्रावर सर्व स्टाफ महिलाच असतील असे त्याचे विशेष असल्याचे सांगण्यात आले. युवकांनी मतदान करावे यासाठी देखील विशेष प्रयत्न करून जनजागृती करण्यात येईल असेही सांगण्यात आले. मतदानाचा टक्का वाढवणे खूप गरजेचे असून त्यादृष्टीने सर्व स्तरांवर प्रयत्न व्हायला हवेत. ज्या मतदारांनी अद्याप।नाव नोंदवले नसेल त्यांनी २३ एप्रिल पर्यन्त त्यांचे नाव नोंदवावे, ऑनलाइन पद्धतीने त्याची कार्यवाही करावी आणि या संधीचा लाभ उठवावा असे आवाहन त्यांनी।केले. गेल्यावेळी या ठिकाणी सुमारे ४५ टक्के मतदान झाले होते यंदा ते वाढवून ७५ टक्यांपर्यन्त जाण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले. 

या ठिकाणी एकूण १९५५ मतदान केंद्र असून त्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. अपवाद वगळता सर्व केंद्र ही तळमजल्यावर असतील, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प सुविधा असेल, आरोग्य पथक तैनात करण्यात येईल. मूलभूत सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध असतील. 

चुनाव पर्व देश का गर्व ही यंदाच्या निवडणूकीची टॅग लाईन असून त्या आधारे सर्व मतदारांना आवाहन करायचे असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा असेही सांगण्यात आले.

 सरकारी अधिकारी, कर्मचारी असे मिळून सुमारे १३ हजार कर्मचारी या लोकसभा क्षेत्रात निवडणूक विषयात कार्यरत असतील. चोवीस तास फ्लाईंग स्कॉड कार्यरत असणार आहे. १९५० या नंबरवर डायल करून मतदार आपले मतदार यादीतले नाव नक्की।करू शकतात असेही सांगण्यात आले.

Web Title: 53 thousand 282 voters increased in Kalyan Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.