मॉकपोल व्यतिरिक्त तीन मते अधिक आढळल्याने केंद्राध्यक्षासह दोन जण निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 20:33 IST2019-04-25T20:30:57+5:302019-04-25T20:33:24+5:30
लोकसभा निवडणुकीत मॉकपोलची (अभिरुप मतदान) ५० मते डिलीट न केली नाहीत आणि तीन मते अतिरिक्त आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला.

मॉकपोल व्यतिरिक्त तीन मते अधिक आढळल्याने केंद्राध्यक्षासह दोन जण निलंबित
जळगाव - लोकसभा निवडणुकीत मॉकपोलची (अभिरुप मतदान) ५० मते डिलीट न केली नाहीत आणि तीन मते अतिरिक्त आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणास जबाबदार धरुन भडगाव येथील मतदान केंद्र क्र.१०७ वरील केंद्राध्यक्ष व एक महिला कर्मचारी अशा दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत निलंबनाची ही पहिलीच कारवाई म्हटली जात आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी गुरुवारी हे आदेश काढले. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष उद्धवराव बाबूराव पाटील ( सहायक शिक्षक, योगेश्वर माध्यमिक विद्यालय, डांगर बु.ता.अमळनेर) आणि मतदान अधिकारी क्र.३ सुनीता नारायण देवरे (शिक्षिका, लाडकूबाई प्राथमिक विद्यामंदिर, भडगाव) यांचा समावेश आहे.
या प्रकाराची जिल्हा निवडणूक अधिकाºयांनी गांभीर्याने दखल घेऊन निवडणूक आयोगाकडे याबाबत अहवाल पाठविला होता.