रक्षा खडसे, स्मिता वाघ यांच्यासह २८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज

By विलास बारी | Published: April 25, 2024 10:56 PM2024-04-25T22:56:34+5:302024-04-25T22:57:45+5:30

शेवटच्यादिवशी गर्दी : आज छाननी, सोमवारपर्यंत माघारीची मुदत

raksha khadse smita wagh along with 28 people filled the nomination form for lok sabha election 2024 | रक्षा खडसे, स्मिता वाघ यांच्यासह २८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज

रक्षा खडसे, स्मिता वाघ यांच्यासह २८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव :रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २८ जणांनी ३९ अर्ज दाखल केले. त्यात रावेरमधून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे तर जळगावमधून स्मिता वाघ यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र प्रल्हादराव पाटील, वंचित बहुजन आघाडीकडून संजय पंडीत ब्राम्हणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शेवटच्या दिवसापर्यंत जळगाव लोकसभा मतदार संघात २५ उमेदवारांनी ३६ अर्ज दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात ३१ उमेदवारांनी ४५ अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्यादिवशी जळगाव मतदारसंघासाठी १७ उमेदवारांनी २१ अर्ज भरले तर रावेर साठी ११ उमेदवारांनी १८ अर्ज भरले.

Web Title: raksha khadse smita wagh along with 28 people filled the nomination form for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.