Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाची दिली होती ऑफर - खडसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 06:24 IST2019-10-17T05:00:22+5:302019-10-17T06:24:26+5:30
नेहरु मैदानावर भाजपचे उमेदवार आमदार सावकारे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपदाची दिली होती ऑफर - खडसे
भुसावळ : राष्ट्रवादी कॉँग्रेसने आपल्यासाठी ए. बी. फॉर्म आणला होता तसेच विरोधी पक्षनेतेपदाची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट आमदार तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी येथे केला.
नेहरु मैदानावर भाजपचे उमेदवार आमदार सावकारे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. खडसे म्हणाले, की गेल्या पाच वर्षांपासून आमदार संजय सावकारे हे माझ्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चि२त होती. उलट उमेदवारी रद्द होवू नये या भितीपोटी जवळचे व शेजारचे आमदार माझ्या जवळून पळून गेले. गेल्या काही काळात माझ्यावर अन्याय झाला मात्र चांगल्या संस्कृतीत जन्माला आलो आहे. जनता माझ्या सोबत आहे. तो पर्यंत मी उभा राहणार आहे. भाजपाने मला राज्यात ओळख दिली आहे. ६ वेळा आमदार, विरोधी पक्षनेतेपद दिले, गटनेते केले व १२ खात्यांचा मंत्रीसुद्धा केले. अशा पक्षाला मी ऐनवेळी सोडणे योग्य वाटत नसल्याने पक्ष सोडण्याचा प्रश्नच येत नाही.
राज्यापाल पदाची दिली होती आॅफर
मला उमेदवारी मिळणार नाही, अशी सूचना दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री व आपल्यात चर्चा झाली होती. मला राज्यपालपदाची आॅफर देण्यात आली होती. राज्यपाल बनून गप्प बसायचे का? जनतेला वाऱ्यावर सोडायचे का? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला.