मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज जळगाव जिल्ह्यात तीन सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 08:33 IST2019-04-19T08:26:12+5:302019-04-19T08:33:58+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (19 एप्रिल) जळगाव जिल्ह्यात येत आहेत. अमळनेर, रावेर व जळगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज जळगाव जिल्ह्यात तीन सभा
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात येत आहेत.अमळनेर, रावेर व जळगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होत आहेत. अमळनेर येथील मारामारीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची तेथे पहिली सभा होणार असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (19 एप्रिल) जळगाव जिल्ह्यात येत आहेत. अमळनेर, रावेर व जळगाव येथे त्यांच्या जाहीर सभा होत आहेत. अमळनेर येथील मारामारीच्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची तेथे पहिली सभा होणार असल्याचे बोलले जात आहे.
दुपारी 12.25 वाजता फडणवीस यांचे जळगाव येथे विमानाने आगमन होईल. विमानतळावरून ते हेलिकॉप्टरने अमळनेकडे रवाना होतील. अमळनेर येथे दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळील मैदानावर त्यांची सभा होईल. यानंतर रावेर येथे दुपारी 2.30 वाजता शिवप्रसाद नगर, बऱ्हाणपूररोड येथे आणि जळगाव येथील सागर पार्क मैदानावर दुपारी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे.