Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:39 IST2026-01-02T16:35:31+5:302026-01-02T16:39:16+5:30
Jalgaon Municipal election Results 2026: अर्ज माघारी घेण्याची मुदत शुक्रवारी संपली. अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भाजपा आणि शिंदेसेनेचे जळगाव महापालिका निवडणुकीत १२ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Jalgaon Municipal election 2026 Latest Update: सत्ताधारी भाजपा-शिंदेसेना युतीने राज्यात होत असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये विजयाचे खाते उघडले आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी भाजपाचे दोन अंकी उमेदवार बिनविरोध विजयी झाले. तर शिंदेसेनेनेचे उमेदवारही बऱ्याच ठिकाणी बिनविरोध विजयी झाले आहेत. जळगावमध्ये युतीने १२ जागांवर बिनविरोध विजय मिळवला आहे.
अनेक वर्षांनंतर राज्यात महापालिकांच्या निवडणुका होत आहे. २९ महापालिका निवडणुकामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले असून, अर्ज माघारी घेण्यापर्यंत अनेक ठिकाणी गोंधळ बघायला मिळाला. अनेकांनी बंडखोरी केली. मात्र, अर्ज माघारी घेतल्यामुळे अनेक ठिकाणी मतदानापूर्वीच उमेदवारांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.
जळगाव महापालिकेमध्ये भाजपा-शिंदेसेनेचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. यात भाजपाचे सहा, शिंदेसेनेच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. गुरुवारी (१ जानेवारी) भाजपाचा एक, तर शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. त्यात शुक्रवारी म्हणजे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भर पडली.
भाजपा-शिंदेसेनेचे कोणते उमेदवार विजयी झाले?
एकूण - 12
शिंदेसेना - 6
भाजपा -6
बिनविरोध विजय उमेदवारांची नावे
१) उज्ज्वला बेंडाळे, भाजपा
२) दीपमाला काळे, भाजपा
३) विशाल भोळे, भाजपा
४) विरेन खडके, भाजपा
५) अंकिता पंकज पाटील, भाजपा
६) वैशाली अमित पाटील, भाजपा
७) गौरव सोनवणे, शिंदेसेना
८) सागर सोनवणे, शिंदेसेना
९) गणेश सोनवणे, शिंदेसेना
१०) रेखा पाटील, शिंदेसेना
११) मनोज चौधरी, शिंदेसेना
१२) प्रतिभा देशमुख, शिंदेसेना