Jalgaon Lok Sabha Election Result 2024: तिसऱ्या फेरीमध्ये जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर
By Ajay.patil | Updated: June 4, 2024 11:05 IST2024-06-04T11:04:57+5:302024-06-04T11:05:36+5:30
Jalgaon Lok Sabha Election Result 2024 : जळगाव मतदार संघात महायुतीच्या स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे यांनी तिसऱ्या फेरीमध्ये देखील आघाडी कायम ठेवली आहे.

Jalgaon Lok Sabha Election Result 2024: तिसऱ्या फेरीमध्ये जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ आघाडीवर
अजय पाटील, जळगाव :जळगाव मतदार संघात महायुतीचे स्मिता वाघ व रावेर मधुन रक्षा खडसे यांनी तिसऱ्या फेरीमध्ये देखील आघाडीकायम ठेवली आहे. तिसऱ्या फेरीमध्ये जळगावात स्मिता वाघ १ लाख २० हजार २४२, शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार ६५ हजार ३४१ मते मिळाली आहे.
जळगाव मतदार संघाची तिसऱ्या फेरीची मतमोजणी झाली असून या मतमोजणीमध्ये भाजपच्या मतादाधिक्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांना तिसऱ्या फेरीत १ लाख २० हजार २४२ मत मिळाली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांना ६५ हजार ३४१ मत मिळाले आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांचा मताधिक्क फेरी अखेर वाढत जात असल्याने जळगाव मतदार संघात वाघ यांचा विजय निश्चीत मानला जात आहे.