If the opponents feel I will not be back - Eknath Khadse | विरोधकांना वाटत होेते मी परत येणारच नाही - एकनाथ खडसे

विरोधकांना वाटत होेते मी परत येणारच नाही - एकनाथ खडसे

जळगाव - रावेर लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारसभेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधकांना वाटत होते मी दवाखान्यातून परत येणारच नाही. परंतु त्यांना मी पुढे घालीन मगच मी जाईन, असा हल्ला त्यांनी आपल्या भाषणात चढवला.
रावेर मतदार संघातून खडसे यांच्या स्नुषा तथा खासदर रक्षा खडसे या उमेदवारी करीत आहे. परंतु ऐन प्रचार सुरु झाला तेव्हा खडसे यांंना उपचारार्थ दवाखान्यात दाखल व्हावे लागले. ते केव्हा परत येतात व प्रचारात उतरतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागून होते. दवाखान्यातून ते शनिवारी जिल्ह्यात परतले. दरम्यान सोमवारी बोदवड येथे सभेत त्यांनी सांगितले की, विरोधकांना वाट होते की, नाथा भाऊ दवाखान्यातून परतच येणार नाही व प्रचारात सहभागीही होता येणार नाही. परंतु मी जनतेच्या आशीर्वादाने आज येथे उभा असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: If the opponents feel I will not be back - Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.