शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली

By विजय.सैतवाल | Updated: May 3, 2024 19:08 IST2024-05-03T19:07:59+5:302024-05-03T19:08:09+5:30

जळगाव जिल्ह्यात अपघात : सुदैवाने कोणाला दुखापत नाही

accident of Two vehicles of Sharad Pawars convoy | शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली

शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे चोपडा येथील प्रचार सभा आटोपून भुसावळकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातीन दोन वाहने एकमेकांवर धडकली. गतिरोधक आल्याने पुढील वाहनाने ब्रेक दाबल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना शुक्रवार, ३ मे रेाजी दुपारी घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. 

रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी चोपडा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी शरद पवार हे उपस्थित होते. दुपारी सभा आटोपल्यानंतर  शरद पवार यांचा ताफा भुसावळकडे रवाना झाला. त्यावेळी यावल तालुक्यातील किनगाव जवळ शरद पवार यांच्या वाहनामागे असलेले दोन वाहने (एमएच १५ सीएम ९२७६) आणि (एमएच ४८ एस ५८९५) एकमेकांवर धडकली.

Web Title: accident of Two vehicles of Sharad Pawars convoy