जालन्यात मतदार जागृती रॅलीस प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:16 IST2019-04-11T00:15:41+5:302019-04-11T00:16:16+5:30

रोटरी क्लब आॅफ सेंट्रल, लायन्स क्लब, जिल्हा वकील संघ, विविध शाळा, महाविद्यालये यांच्या वतीने रॅलीचे आयोजन केले होते.

Voters awareness rally response in Jalna | जालन्यात मतदार जागृती रॅलीस प्रतिसाद

जालन्यात मतदार जागृती रॅलीस प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रोटरी क्लब आॅफ सेंट्रल, लायन्स क्लब, जिल्हा वकील संघ, विविध शाळा, महाविद्यालये यांच्या वतीने २३ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानास जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी रॅलीचे आयोजन केले होते.
बुधवारी सकाळी मोतीबागेजवळून ही रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह रोटरी क्लबचे सुरेंद्र मुनोत, अभय करवा, भरत गादिया, विजय दाड, पवन जोशी, संजय अग्रवाल, आदेश मंत्री, गोविंद गोयल, वीरेंद्र देशपांडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदार जागृती संदर्भात पथनाट्य सादर केले. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता. राज्य राखीव पोलीस दलाच्या बँण्डचा सहभाग होता.

Web Title: Voters awareness rally response in Jalna