"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
By विजय मुंडे | Updated: November 30, 2024 19:49 IST2024-11-30T19:49:07+5:302024-11-30T19:49:44+5:30
''रावसाहेब दानवे यांचे कार्य एकनिष्ठपणे सुरू आहे. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ महाराष्ट्राला व्हावा''; युवकाने केले पत्रात नमूद

"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
जालना : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी धनगर समाजातील युवक कृष्णा गंगाधर गायके याने स्वत:च्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. त्याचे हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
धनगर समाजाच्या वतीने ही मागणी करीत असल्याचे कृष्णा गंगाधर गायके याने पत्रात नमूद केले आहे. रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते असून, विद्यार्थीदशेपासून ते जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते राहिले आहेत. तळागळातील कार्यकर्त्यांशी व समाजातील लोकांशी त्यांची नाळ जोडलेली आहे. त्यांनी आतापर्यंत पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील विविध पदे भूषवलेली आहेत. त्यांचे कार्य एकनिष्ठपणे सुरू आहे. त्यांच्या ज्ञानाचा, कार्याच्या अनुभवाचा व आजपर्यंत दिलेल्या सेवेचा लाभ महाराष्ट्राला व्हावा म्हणून अखिल भारतीय धनगर समाजाच्या वतीने रावसाहेब दानवे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी द्यावी, अशी विनंतीही कृष्णा गायके या युवकाने पंतप्रधानांकडे केली आहे. त्याची प्रत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पाठविली आहे.