Maharashtra Election 2019 : आजी-माजी खासदाराच्या मुलांमध्ये रंगणार सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 08:32 PM2019-10-10T20:32:12+5:302019-10-10T20:35:51+5:30

६ उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात 

Maharashtra Election 2019: A fight between MP and ex-MP's children will take place in Bhokardan | Maharashtra Election 2019 : आजी-माजी खासदाराच्या मुलांमध्ये रंगणार सामना

Maharashtra Election 2019 : आजी-माजी खासदाराच्या मुलांमध्ये रंगणार सामना

googlenewsNext
ठळक मुद्दे संतोष दानवे विरुध्द चंद्रकांत दानवे यांच्यात लढत

- फकीरा देशमुख

भोकरदन विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आ. संतोष दानवे व मा. खा. पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यात होईल. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष आहे. 

भोकरदन विधानसभा मतदार संघात दीपक बोºहाडे (वंचिंत बहुजन आघाडी), निवृत्ती बनसोडे (बसपा), राजू गवळी (भारतीय ट्रायबल पार्टी), मुजाहिद अब्दुल बारी सिद्दीकी (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या मतदारसंघात भोकरदन तालुक्यातील ९४ तर जाफराबाद तालुक्यातील १०१ गावांचा समावेश होतो. जाफराबाद तालुक्यातील मतदारांची संख्या कमी असल्याने  येथे आतापर्यंत भोकरदनचाच आमदार राहिला आहे.  

२०१४ च्या निवडणुकीत संतोष दानवे यांनी  चंद्रकांत दानवे यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वीच्या तिनही निवडणुकींमध्ये चंद्रकांत दानवे यांनी विजय संपादन करून हॅटट्रिक केली होती. १९९० पर्यंत हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.  मात्र त्यानंतर येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वर्चस्व निर्माण केले. त्यांनी १९९० व १९९५ अशा दोन्ही निवडणुका जिंकल्या.  त्यानंतर दानवे लोकसभेसाठी उभे राहिले. या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांची गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सत्ता आहे. सहकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहे. केवळ भोकरदन नगरपरिषद ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर जाफराबादची नगर पंचायतही भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे यंदा संतोष दानवे बाजी मारतात की, राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे निवडून येतात, हे येणाऱ्या काळातच समजेल.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
- मतदार संघात मका, सोयाबीन, मिरची या पिकांवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भोकरदन मतदार संघात जि.प. तसेच राज्य सरकारच्या आरोग्य सेवेकडे अधिक देण्याची गरज आहे. 
- भोकरदन, जाफराबाद येथे औद्योगिक वसाहती आहे. मात्र या ठिकाणी कोणताही मोठा उद्योग उभा राहिला नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ शिवाय भोकरदन येथे बस आगाराचा प्रश्न प्रलंबित.
- खडकपुर्णा येथुन होणारी सिल्लोड -भोकरदन संयुक्त पाणीपुरवठा योजना प्रलंबित पडलेली आहे़ भोकरदन , जाफराबाद शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांचा गाळ्याचा प्रश्न. क्रीडा संकुलाचे काम अर्धवट. अशी अनेक प्रश्न मतदार संघात अद्यापही प्रलंबित आहेत. 

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजू
संतोष दानवे (भाजप)
- सहकार क्षेत्रात मोठे काम. सत्ता असल्याने मतदार संघात केलेली कामे. 
 - शैक्षणिक संस्थांचे जाळे, साखर कारखाना. नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा.
- पं. स, कृऊबा समिती ताब्यात. दांडगा जनसंपर्क व तरूणांना केले आकर्षित.

चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी -काँग्रेस)
- सत्तेत असताना मतदार संघात २२० केव्ही केंद्राची उभारणी करुन विजेचा प्रश्न निकाली काढला. 
- त्याचप्रमाणे गावागावात प्रत्येक समाजाला दिलेले सामाजिक सभागृह.
अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून केलेली मदत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

दीपक बोºहाडे (वंचित)
- या मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. 
- पोलीस सेवेतून सेवानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश.
- एमआयएमचा उमेदवार नसल्याने वंचिंत आघाडीला फायदा होण्याची शक्यता.

निवृत्ती बनसोडे(बसपा)
- या मतदार संघातील समाजाच्या मतांचा आधार. 
- मायावती यांना मानणारा मतदार हीच निवृत्ती बनसोडे यांची जमेची बाजू. 
- सर्वसामान्यांच्या कामाविषयी तळमळ.
- प्राध्यापक असल्याने शिक्षकांच्या मतांचा फायदा.

2०14चे चित्र
संतोष दानवे (भाजप विजयी)  
चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत)

Web Title: Maharashtra Election 2019: A fight between MP and ex-MP's children will take place in Bhokardan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.