Lok Sabha Election 2019 : जालना लोकसभा मतदारसंघात ५२ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:31 IST2019-04-05T14:28:06+5:302019-04-05T14:31:25+5:30
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल आहे.

Lok Sabha Election 2019 : जालना लोकसभा मतदारसंघात ५२ अर्ज
जालना : जालना लोकसभा मतदारसंघात २८ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. ती मुदत गुरुवारी संपली. या मतदारसंघात ३८ जणांनी एकूण ५२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात गुरुवारी म्हणजेच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
विशेष म्हणजे यात अपक्षांचा भरणा जास्त असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान प्रमुख उमेदवारांचा विचार केल्यास भाजपकडून रावसाहेब दानवे, काँग्रेसकडून विलास औताडे यांचा समावेश असून, वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. शरदचंद्र वानखेडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी ही शुक्रवारी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल आहे. यानंतरच मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.