जालना शहरासह जिल्ह्यात दानवेंच्या विजयाचा फटाके फोडून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:20 IST2019-05-24T01:19:58+5:302019-05-24T01:20:12+5:30
रावसाहेब दानवे यांनी सुरुवातीपासून लीड घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शहरातील संभाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयासमोर येऊन कार्यकर्त्यांनी जमा होऊन फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

जालना शहरासह जिल्ह्यात दानवेंच्या विजयाचा फटाके फोडून जल्लोष
जालना : सर्व माध्यमातून एनडीएला एक्झिट पोलमध्ये बहुमतापेक्षा जास्त जागा मिळेल अशी भविष्यवाणी वर्तविली होती. यामुळे निकालाची दिवशी काय होईल याची प्रतीक्षा उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यासह कार्यकर्त्यांना होती. यामुळे सकाळपासूनच कार्यकर्त्यामध्ये धाकधुकीसह उत्साह दिसून आला.
जशीजशी निकालाच्या फेऱ्या सुरु झाल्या त्यामध्ये रावसाहेब दानवे यांनी सुरुवातीपासून लीड घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. शहरातील संभाजीनगर येथील पक्षाच्या कार्यालयासमोर येऊन कार्यकर्त्यांनी जमा होऊन फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
देशभरात भाजपाने निकालात मुसंडी घेतल्याने कार्यकर्त्यानी शहरातील चौकाचौकात येऊन फटाक्याच आतषबाजी केली. हेच चित्र ग्रामीण भागात सुध्दा पहायला मिळाले. घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथे तर सकाळी साडे आठ वाजल्यापासून टीव्हीच्या जमान्यात देखील रेडिओवर निकाला ऐकण्यासाठी गल्लीबोळात गर्दी केली होती. जाफराबाद तालुक्यातील माहोरा, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी भर उन्हात आतषबाजी करुन रावसाहेब दानवे यांच्या विजयाबद्दल आनंदोत्सव साजरा केला. तसेच मोदी आणि दानवे यांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक काढून संभाजी महाराज चौक येथे कार्यकर्त एकत्र जमले होते. कार्यकर्त्यांनी वर्तविलेल्या भविष्यवाणीपेंक्षा जास्त जागा निवडून आल्याने हा विजय जनतेचा विजय असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले.
खा. रावसाहेब रावसाहेब दानवे सलग पाचव्यांदा जालना लोकसभेत विजय झाल्याने नागरिकांनी फटाके फोडून गुरूवारी त्यांच्या विजयाचे स्वागत केले. यामुळे शहरातील काही परिसरामध्ये आनंददायी व चैतन्यमय वातावरण गुरूवारी तयार झाले होते.
गुरूवारी सकाळपासून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
प्रत्येक जण टीव्ही, मोबाईल व सोशल मीडियाच्या माध्यमातून निकालाची आकडेवारी जाणूक घेण्याचा प्रयत्न करित होता.
जसा- जसा उन्हाचा पारा चढत होता जणू काय त्याच प्रमाणे निकालाची आकडेवारी हाती येत होती.
यात प्रत्येक फेरीत खा. रावसाहेब दानवे यांच्या पारड्यात मताधिक्य अधिक प्राप्त होत होते.
दुपारनंतर दानवे यांचा दणदणीत विजय असल्याचे समजताच शहरातील भाग्य नगर, शनि मंदिर, लक्कडकोट परिसरात युवकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
राजुरात जल्लोष
राजूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी विजय मिळवल्याचे जाहीर झाल्यानंतर राजूर येथे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, गुलाल उधळत शिवाजी चौकात डीजेच्या तालावर जल्लोष साजरा केला.
यावेळी भाऊसाहेब भुजंग, रामेश्वर सोनवणे, रतन ठोंबरे, विनोद डवले, राहुल दरक, आप्पासाहेब पुंगळे, गणेश पुंगळे, मुकेश अग्रवाल, ललित जोशी, समाधान पालोदे, हरिभाऊ काळे, बबन मगरे, विष्णू इंगोले, संतोष मगरे, अर्जून मांगडे, परमेश्वर कुमकर, नारायण पवार, परमेश्वर पुंगळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले
होते.