जालन्याला मिळणार पहिली अनुसूचित जातीची महिला महापौर! भाजपच्या चार नगरसेविकांमध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:53 IST2026-01-22T14:50:19+5:302026-01-22T14:53:11+5:30

भाजपच्या वंदना मगरे, अॅड. रीमा खरात-काळे, श्रद्धा साळवे, रूपा कुरील यापैकी एकीस महापौरपदी संधी मिळणार आहे.

Jalna Mayor 2026: Jalna will get its first SC woman mayor! The race is on between these four BJP corporators | जालन्याला मिळणार पहिली अनुसूचित जातीची महिला महापौर! भाजपच्या चार नगरसेविकांमध्ये चुरस

जालन्याला मिळणार पहिली अनुसूचित जातीची महिला महापौर! भाजपच्या चार नगरसेविकांमध्ये चुरस

जालना: जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ४१ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. या विजयानंतर आता शहराच्या पहिल्या महापौर पदाचा मान कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आरक्षणाच्या सोडतीनुसार, जालन्याचा पहिला महापौर हा अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गाचा असणार आहे.

भाजपचे वर्चस्व आणि विरोधी पक्षांची स्थिती
एकूण ६५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने ४१ जागा जिंकत महापालिकेवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला ९ आणि एमआयएमला केवळ २ जागा मिळाल्या आहेत. एका अपक्ष उमेदवारानेही बाजी मारली आहे.

महापौर पदासाठी भाजपमध्ये 'काँटे की टक्कर'
अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी हे पद राखीव असल्याने भाजपच्या गोटातून चार प्रमुख नावांची चर्चा सुरू आहे: १. वंदना मगरे, २. अॅड. रीमा खरात-काळे, ३. श्रद्धा साळवे आणि ४. रूपा कुरील. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने या चारपैकी एका महिलेच्या गळ्यात महापौरांची माळ पडणार हे निश्चित आहे.

भाजपमध्ये हालचालींना वेग
जालन्याच्या पहिल्या महानगरपालिकेच्या इतिहासात पहिली महापौर म्हणून कोणाचे नाव कोरले जाते, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. लवकरच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Web Title : जालना को मिलेगी पहली अनुसूचित जाति की महिला महापौर; भाजपा में दौड़

Web Summary : भाजपा ने जालना का पहला नगर निगम चुनाव बहुमत से जीता। महापौर का पद अनुसूचित जाति की महिला के लिए आरक्षित है। भाजपा की चार पार्षद इस पद के लिए प्रतिस्पर्धा कर रही हैं। पार्टी नेतृत्व जल्द ही एक नाम पर मुहर लगाएगा।

Web Title : Jalna to Get First Scheduled Caste Woman Mayor; BJP Race

Web Summary : BJP won Jalna's first municipal corporation election with a majority. The mayor's seat is reserved for a Scheduled Caste woman. Four BJP councilors are vying for the position. The party leadership will soon finalize a name.