'भाजप २९ महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष, विरोधकांचे नगरसेवकही आमच्या बाजूने; विजयानंतर रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 17:51 IST2026-01-16T17:46:01+5:302026-01-16T17:51:53+5:30

आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेने भाजपला २/३ बहुमत दिले आहे.

'BJP is the largest party in 29 municipal corporations, even the opposition corporators are on our side; Raosaheb Danve's first reaction after victory | 'भाजप २९ महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष, विरोधकांचे नगरसेवकही आमच्या बाजूने; विजयानंतर रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया

'भाजप २९ महानगरपालिकांमध्ये सर्वात मोठा पक्ष, विरोधकांचे नगरसेवकही आमच्या बाजूने; विजयानंतर रावसाहेब दानवेंची पहिली प्रतिक्रिया

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून, या निकालात भाजप एक नंबरचा पक्ष ठरला आहे. मुंबईतही २५ वर्षांनंतर ठाकरेंची सत्ता गेली आहे. जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाने विजय मिळवला. दरम्यान, या निकालावर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २९ महानगरपालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai BMC Results 2026 LIVE: मुंबईचे ५ वाजेपर्यंतचे अधिकृत आकडे आले! ठाकरे बंधू आणि काँग्रेसची बेरीज केल्यास महायुतीशी 'काँटे की टक्कर'

रावसाहेब दानवे म्हणाले की, जालना महापालिकेत भाजपने ६५ पैकी ४१ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे जालना महापालिकेचा पहिला महापौर भाजपचाच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचे निवडून आलेले काही नगरसेवकही भाजपच्या बाजूने राहणार असल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “७० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जनतेने भाजपला २/३ बहुमत दिले आहे.

भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनीही निकालावर प्रतिक्रिया देताना, “हा माझा वैयक्तिक विजय नसून हा भाजपचा विजय आहे,” असे सांगत पक्षाच्या यशाचे श्रेय कार्यकर्ते आणि मतदारांना दिले.

महानगरपालिका निवडणुकांच्या या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Web Title : भाजपा 29 नगर निगमों में सबसे बड़ी पार्टी, विपक्ष के समर्थन का दावा

Web Summary : भाजपा 29 नगर निगमों में सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी, नेताओं ने जालना में जीत का दावा किया और विपक्षी पार्षदों से समर्थन मिलने की उम्मीद जताई। रावसाहेब दानवे ने परिणामों की सराहना करते हुए सफलता का श्रेय जनता के विश्वास और पार्टी के प्रयासों को दिया। इस जीत से राज्य की राजनीति पर भाजपा की पकड़ मजबूत हुई है।

Web Title : BJP Biggest Party in 29 Corporations, Claims Support from Opposition

Web Summary : BJP emerged as the largest party in 29 municipal corporations, with leaders claiming victory in Jalna and anticipating support from opposition corporators. Raosaheb Danve hailed the results, attributing the success to public trust and party efforts. The win strengthens BJP's grip on state politics.