लोकसभेसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:29 IST2019-04-05T00:29:11+5:302019-04-05T00:29:53+5:30
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार ४ एप्रिल रोजी नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

लोकसभेसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार ४ एप्रिल रोजी नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.
नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्यांमध्ये जगन्नाथ कचरु रिठे (अपक्ष), फेरोज अली (बहुजन मुक्ती पार्टी), ज्ञानेश्वर दगडूजी नाडे (अपक्ष), योगेश दत्तू गुल्लापेल्ली ( अपक्ष), या उमेदवारांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्र सादर केले, तर महेंद्र कचरु सोनवणे (बहुजन समाज पार्टी), त्रिंबक बाबूराव जाधव (स्वतंत्र भारत पक्ष), अहेमद रहीम शेख (अपक्ष), विलास औताडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), नामदेव श्रीपतराव जंजाळ (अपक्ष), सुदाम श्रीमंतराव इंगोले (अपक्ष), श्याम सिरसाठ (अपक्ष), अरुण चिंतामण चव्हाण (अपक्ष), किशोर साहेबराव राऊत (अपक्ष), उत्तम धनू राठोड (आसरा लोकमंच पार्टी), नसीबखान रऊफखान पठाण (अपक्ष), सपकाळ लीलाबाई धर्मा (राष्ट्रीय महिला पार्टी), प्रमोद बाबूराव खरात (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), शेख रजिया बेगम मोहम्मद नाहेर खाटीक (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रभाकर भुसार (अपक्ष) या १९ उमेदवारांनी गुरूवारी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यत जालना लोकसभा मतदारसंघातून ३७ उमेदवारांनी ५२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाघिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.
दरम्यान शुक्रवारी या अर्जांची छाननी होणार असून, या छाननीत किती अर्ज बाद होतात, याकडे लक्ष लागून आहे.