हिंदू मतदारांवर डोळा, अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 12:00 AM2020-08-23T00:00:28+5:302020-08-23T09:12:46+5:30

गणेशोत्सवानिमित्त आज राज्यातील आणि देशातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आहे.

Eye on Hindu voters, Ganesh Chaturthi wishes from US presidential candidate joe biden | हिंदू मतदारांवर डोळा, अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

हिंदू मतदारांवर डोळा, अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांनी दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Next
ठळक मुद्देयंदा अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गणपती बाप्पा मोरयाचा गजर डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी गणेशोत्सवानिमित्त गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.अमेरिकेत या वर्षअखेरीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे

वॉशिंग्टन - भारतीय संस्कृतीत प्रथम पूजेचा मान असलेल्या श्रीगणेशाच्या उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरात यावर्षी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत राहून साजरा केला जात आहे. गणेशोत्सवानिमित्त आज राज्यातील आणि देशातील अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा अमेरिकन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी गणेशोत्सवानिमित्त अमेरिका आणि भारतासह जगभरातील गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांचे प्रमाण उल्लेखनीय असल्याने येथील हिंदू मतांवर डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा डोळा आहे. दरम्यान, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी आज गणेशोत्सवानिमित्त विशेष ट्विट करून गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आहे. जो बिडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार आहेत.

शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये जो बिडेन म्हणाले की, अमेरिका आणि भारतासह संपूर्ण जगातील हिंदू लोक गणेश चतुर्थी साजरी करत आहे. तुम्ही सर्व अडथळे पार करू शकता आणि नव्या सुरुवातीच्या दिशेने एक पाऊल टाकू शकता. 



अमेरिकेत या वर्षअखेरीच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आता प्रचार अभियानाने जोर पकडला आहे. तसेच दोन्ही प्रमुख उमेदवार भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

Web Title: Eye on Hindu voters, Ganesh Chaturthi wishes from US presidential candidate joe biden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.