हे ज्या पक्षात असतात त्यांची सत्ता जाते; या पुतण्याचा पायगुणच वाईट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 16:47 IST2019-04-07T16:45:44+5:302019-04-07T16:47:27+5:30

धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका

this nepew have bad luck : Pankaja munde | हे ज्या पक्षात असतात त्यांची सत्ता जाते; या पुतण्याचा पायगुणच वाईट

हे ज्या पक्षात असतात त्यांची सत्ता जाते; या पुतण्याचा पायगुणच वाईट

हिंगोली : काँग्रेस व राष्ट्रवादीने ब्रिटीशांची तोडा, फोडा राज्य करा ही नीती वापरली. मात्र आमच्या बीडमध्ये ज्या पुतण्याला हे घेवून गेले. त्याचा पायगुणच वाईट असल्याची टीका ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. हिंगोली येथे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

धनंजय मुंडे यांचे नाव न घेता मंत्री मुंडे म्हणाल्या, हे राजकारणात आले तेव्हा आमची सत्ता गेली. तर ते राष्ट्रवादीत गेले अन् त्यांची सत्ता गेली. आता ती पुन्हा येणार नाही. दुसऱ्यांवर हे टीका करतात. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांच्या घरातीलच किती उमेदवार आहेत, ते पहा. काँग्रेसने ५६ पक्षांना एकत्र केले. मात्र यांची सत्ता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर नेतृत्व आहे. तर काँग्रेसवाले देशद्रोहाचा गुन्हा रद्द करायला निघाले. उद्या कोणी तिरंगा पायदळी तुडवला तर तुम्ही सहन करणार आहात का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

यावेळी माजी मंत्री सूर्यकांता पाटील तर पालकमंत्री दिलीप कांबळे, आ.तान्हाजी मुटकुळे, माजी खा.शिवाजी माने, माजी आ.गजानन घुगे, आनंदराव जाधव, संतोष बांगर, बाबाराव बांगर आदींची उपस्थिती होती.
 

Web Title: this nepew have bad luck : Pankaja munde