भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अवैध होर्डींगमुळे अपघात घडल्याची शंका
By अंकुश गुंडावार | Updated: August 12, 2024 11:17 IST2024-08-12T11:17:01+5:302024-08-12T11:17:51+5:30
Gondia : ट्रकच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू

Woman dies in collision with speeding truck; Accident is suspected to be due to illegal hoarding
गोंदिया: शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राणी अवंतीबाई चौकात सोमवारी १२ सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकच्या चाकाखाली येऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.सदर महिला ही दुचाकी एमएच ३१ व्ही ४१५३ ने शाळेत शिकवण्याकरीता जात असल्याची माहिती आहे. अल्विना लुईस असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
हनुमानमंदिर गांधीनगर नागपूर येथील रहिवासी असल्याचे कळते. या चौक परिसरात मोठ्या प्रमाणात तथाकथीत युवा नेत्यांचे अनधिकृत होर्डींग लागले असून या होर्डींगमुळे दुसरीकडून येणारे दिसून येत नाही. त्यातच सहयोग हाॅस्पीटलच्या बाजूने असलेल्या भागातही मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावर वाहने ठेऊन अर्धा रस्ता व्यापला जातो,त्यामुळे सुध्दा रहदारीला त्रास होत असतो.गेल्या काही दिवसापुर्वीच शरद पवार राष्ट्रवादी गटाने रस्त्यावरील वाहनांना घेऊन वाहतुक विभागाला निवेदन दिले होते,त्यानंतरही विभागाला जाग आली नाही आज त्या परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका महिलेला चिरडल्याने नागरिकांत मोठा असंतोष दिसून येत आहे. तसेच मुख्य रस्त्यावर अवैध होर्डींग लावणारे व वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.