अवकाळी पावसाने लावली हजेरी; पाऊस बरसल्याने वातावरण कूल
By कपिल केकत | Updated: October 19, 2023 19:45 IST2023-10-19T19:45:45+5:302023-10-19T19:45:55+5:30
पावसाळा आता हिवाळा सुरू झाला असतानाच गुरुवारी (दि.१९) सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या.

अवकाळी पावसाने लावली हजेरी; पाऊस बरसल्याने वातावरण कूल
गोंदिया: पावसाळा आता हिवाळा सुरू झाला असतानाच गुरुवारी (दि.१९) सायंकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. १०-१५ मिनिटे बरसलेल्या या सरींमुळे मात्र वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली होती. ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला एक-दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती.
त्यामुळे पाऊस आणखी काही काळ मुक्कामी राहणार असे वाटले होते. मात्र, त्यानंतर पावसाने पाय काढून घेतला व पावसाळ्याचा अंत झाला होता. आता सुमारे पंधरा दिवसांपासून चांगलेच उन्ह तापत असून ऑक्टोबर हीटचा फटका जिल्हावासीयांना सहन करावा लागत आहे. अशातच हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी काही वेळ पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरण कूल झाले होते.