रस्ता अपघातापेक्षा तंबाखू घेतो अधिक बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 16:12 IST2024-05-15T16:11:33+5:302024-05-15T16:12:43+5:30
दर पाचपैकी एकाच्या मृत्यूचे कारण तंबाखू : व्यसनापासून राहा दूर

Tobacco kills more people than road accidents
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतामध्ये कोरडी पाने, सिगारेट, विडी, चिलम, गुटखा आदी अशा विविध रूपात तंबाखू सेवन केले जाते. देशात दरवर्षी रस्ता किंवा अपघातात ५० हजार लोक मृत्युमुखी पडतात; मात्र तंबाखूमुळे साधारणतः १० लाख लोक मरण पावतात. दर पाच व्यक्तींमधील एका व्यक्तीच्या मरणाचे कारण तंबाखू आहे, अशी माहिती डॉ. अनिल आटे यांनी दिली.
तंबाखू सेवनामुळे अनेक प्रकारचे रोग जडतात आणि त्याचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. यामध्ये अथरोस्कोलोरोसिस, हार्ट अटॅक, पेरिफेरल वॅस्कूलर डिसिज, ब्रेन स्ट्रोक, अॅम्पायसिमा लंग कॅन्सर, फिटल डॅमेज, लॅरिंजियल कॅन्सर, डेंटल प्रॉब्लेम, ल्यूकोप्लाकिया, ओरल सबम्युकोसल फायब्रोसिस, ओरल कॅन्सर आदींचा समावेश आहे. तसेच प्रती दिवस तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास कर्करोग होतो. पण वेळेवर उपचार केल्यास बरा होऊ शकतो. प्रतिबंध व उपचार योग करून आपल्या मनाचा कठोर निश्चय करा व संकल्प शक्ती वाढवून तंबाखूच्या नशेचा परित्याग केला पाहिजे.
तंबाखूमधील विषारी द्रवाचे शरीरावर परिणाम
निकोटिन: कॅन्सर, रक्तचाप, कार्बन मोनॉक्साईड हृदयरोग, अंधत्व, दमा.
मार्श गॅस : शक्तिहीनता, नपुंसकता.
अमोनिया-१: मंद पाचनशक्ती, पित्ताशय विकृती.
कोलोडॉन : स्नायूंमध्ये विकृती. डोके दुखणे.
पापरीडीन अजीर्ण, डोळ्यांची जळजळ.
कार्बालिक अॅसिड अनिद्रा, विस्मरण.
परफेरॉल : अशक्तपणा.
अँजेलिन सायनोझोनः रक्तविकार.