मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण; अर्ज केला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:13 IST2024-09-27T16:12:45+5:302024-09-27T16:13:55+5:30
Gondia : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण

Three months of free training for students from the Matang community; Did you apply?
गोंदिया : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातर्फे मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याकरिता विविध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी मंडळाकडे प्रस्ताव पाठविलेले आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. कौशल्य प्रशिक्षणातून मुले-मुली स्वतः व्यवसायातून उद्योगही उभारणी करू शकणार आहे. त्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे.
तीन महिन्यांचे मोफत व्यावसायिक प्रशिक्षण
रोजगारासाठी स्किल डेव्हलपमेंट असलेली फळी उभी करण्याकरिता शासनाने इलेक्ट्रिशन, वेल्डर, कार चालक तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण समाजातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी योजना आणलेली आहे.
अर्ज कोठे कराल?
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आवडत्या प्रशिक्षणासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे. त्यांची निवड करून प्रशिक्षण संस्थेकडे त्यांना पाठविण्यात येईल.
अर्ज कसा कराल?
ठरवून दिलेल्या रोजगाराविषयी स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज करावा.
कागदपत्रे कोणती आवश्यक?
तुम्ही शिक्षण घेतलेल्या मूळ कागदपत्रांसह अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या पोर्टलवर स्किल डेव्हलपमेंटसाठी अर्ज करायचा आहे.
कोणते प्रशिक्षण मिळणार?
■ स्वतः कोणता व्यवसाय निवडायचा वेल्डर, फिटर, वाहनचालक, तसेच विविध स्किल डेव्हलपमेंटचे विषय त्यात देण्यात आलेले आहेत.
■ आपल्याला आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासाठी आपण अर्ज करायचा आहे. तीन महिने प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला प्रमाणपत्र मिळणार आहे.