दोन युवक-युवतीचा पुराडा येथे संशयास्पद मृत्यू; मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
By नरेश रहिले | Updated: December 23, 2023 19:05 IST2023-12-23T19:02:55+5:302023-12-23T19:05:46+5:30
मुलगा हा झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

दोन युवक-युवतीचा पुराडा येथे संशयास्पद मृत्यू; मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला
गोंदिया: सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पुराडा येथे २२ वर्ष वयोगटातील एक तरूण व एक तरूणी या दोघांचा २३ डिसेंबर रोजी मृतदेह आढळला. मुलगा हा झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तर त्याच झाडाखाली मुलगी पडलेल्या अवस्थेत आढळली. त्यांची हत्या की आत्महत्या ही बाब स्पष्ट झाली नसून उत्तरीय तपासणी अहवालानंतर ही बाब स्पष्ट होईल. श्रीकांत महादेव कापगते (२२) रा. पुराडा ता. देवरी असे मृत मुलाचे नाव आहे. तर टिकेश्वरी सुकलाल मिरी (२२) रा. हलबीटोला ता. देवरी जि. गोंदिया असे मृत मुलीचे नाव आहे. मृतक श्रीकांतचे वडील विजय महादेव कापगते (५२) रा. पुराडा ता. देवरी हे २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आपल्या शेताकडे पाणी पाहायला गेले.
त्यांच्या शेताच्याच बाजूला असलेले शिवचरन गुनाजी आचले यांच्या शेतात पळसाच्या झाडाला फासावर लटकत असल्याने कोण आहे हे पाहण्यासाठी ते जवळ गेले असतांना त्यांचाच मुलगा असल्याचे लक्षात आले. त्या झाडाखालीच एक मुलगी मृतावस्थेत दिसली. लगेच त्यांनी गावचे पोलीस पाटील सुभाष अंबादे यांना फोनवर माहिती दिली. पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना मािहती देण्यात आले. सालेकसा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे नेण्यात आले. त्यांच्या पार्थीवावर उत्तरीय तपासणी सुरू आहे. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे. तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील करीत आहेत. त्या दोघांचा प्रेम प्रकरण असावा या प्रेम प्रकरणातून त्यांनी आत्महत्या केली अशी चर्चा परिसरात होती.