तुमच्या गावाचा कारभार पाहा एका क्लिकवर; 'मेरी पंचायत' ॲपवर मिळेल सरपंचाचा लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:32 IST2025-06-10T17:30:46+5:302025-06-10T17:32:10+5:30

Gondia : 'मेरी पंचायत'वर क्लिक केल्यास दिसणार गावांचा कारभार ! पंचायत राज मंत्रालयाने ग्रामस्थांसाठी आणले अॅप

See the administration of your village with one click; Sarpanch's accounts will be available on the 'Meri Panchayat' app | तुमच्या गावाचा कारभार पाहा एका क्लिकवर; 'मेरी पंचायत' ॲपवर मिळेल सरपंचाचा लेखाजोखा

See the administration of your village with one click; Sarpanch's accounts will be available on the 'Meri Panchayat' app

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
डिजिटल युगात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पारदर्शकता यावी, एका क्लिकवर सर्वसामान्यांना माहिती मिळावी, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने एक पाऊल पुढे टाकत 'मेरी पंचायत' हे अॅप आणले आहे. या माध्यमातून लोकांना आता आपल्या गावचा कारभार कसा सुरू आहे? याची माहिती सहजरीत्या उपलब्ध होणार आहे.


केंद्र तसेच राज्य शासनाने ग्रामपंचायत अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. विकासाच्या वाटेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी थेट ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ग्रामपंचायतीच्या कारभारात पादर्शकता असावी व लोकांनाही आपल्या गावात काय सुरू आहे? कोणत्या योजना आल्या आहेत? किती निधी कोणत्या सरकारकडून मिळाला? आदी प्रश्नांची उत्तरे सहजरीत्या उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने 'मेरी पंचायत' हे अॅप आणले आहे.


लेखाजोखा येणार समोर
'मेरी पंचायत' या अॅपच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामपंचायतीचा सामाजिक तसेच आर्थिक बाबींचा लेखाजोखा लोकांच्या समोर येणार आहे. त्यामुळे आता गावाशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी लोकांना आता ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही.


२५० शब्दांत नोंदवा अभिप्राय
ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थ म्हणून तुम्ही २५० शब्दांत आपला अभिप्रायदेखील नोंदवू शकता. स्थानिक पातळीवरील एखाद्या कामाची सूचना फोटोसह सूचित करून प्रशासनाला स्मरण करून देऊ शकता. तसेच काही समस्यांचे फोटो अपलोड करून झालेल्या कामाचे कौतुक किंवा चुका निदर्शनास आणून देऊ शकता.


ॲपवर काय-काय दिसणार?

  • या माध्यमातून लोकांना ग्रामपंचायत सदस्य किती? एकूण किती समित्या स्थापन केल्या आहेत ? त्यांचे अध्यक्ष कोण आहेत? नोटीस बोर्डच्या माध्यमातून समाजाला काय सूचित केले ? ग्रामपंचायतीला मिळणारे अनुदान कोणत्या प्रकारचे आहे?
  • आपल्या पंचायतीची एकूण बँक 3 खाती किती आहेत, त्यात किती रक्कम शिल्लक आहे, कोणत्या कामासाठी किती रक्कम खर्च केली, ग्रामपंचायतीने केलेले एखादे काम कोणत्या स्टेजवर आहे, दिलेली देयके कशाप्रकारे दिली गेली, याची माहिती मिळते.
  • गावात पाण्याचे स्रोत व नळ 3 कनेक्शन किती आहेत? पाणी तपासणी कोण करते? हे जाणून घेण्याची सुविधाही अॅपमध्ये आहे.


"ग्रामीण प्रशासनातील कामकाज पारदर्शक पद्धतीने लोकांपुढे मांडण्यासाठी व लोकांच्या सूचना विचारात घेण्यासाठी शासनाने एक उल्लेखनीय प्रकल्प म्हणून 'मेरी पंचायत' अॅप कार्यान्वित केले आहे."
- रितेश शहारे, ग्रामपंचायत अधिकारी, भजेपार


"केंद्र सरकारच्या 'मेरी पंचायत' या अॅपद्वारे गावाच्या विकासाचा लेखाजोखा प्रत्येक व्यक्तीसमोर येणार आहे. त्यामुळे हे अॅप अत्यंत उपयुक्त आहे.
- ओ. जी. बिसेन, ग्रामपंचायत अधिकारी


'मेरी पंचायत' या अॅपमुळे गाव पातळीवर होणाऱ्या विकासात्मक गोष्टींसोबतच विविध लेखी सूचना घरबसल्या करू शकतो. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे अॅप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावातील प्रत्येक युवकाने संबंधित अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करावे."
- कमलेश बिसेन, जिल्हाध्यक्ष, ग्रामपंचायत अधिकारी संघटना

Web Title: See the administration of your village with one click; Sarpanch's accounts will be available on the 'Meri Panchayat' app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.