निवडणुका पुढे ढकलणे चुकीचे, निवडणूक आयोगाचा गलथान कारभारः प्रफुल्ल पटेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:28 IST2025-12-03T13:27:32+5:302025-12-03T13:28:48+5:30
Gondia : निवडणूक आयोगाने राज्यातील काही ठिकाणच्या नगरपरिषद आणि नगपंचायत निवडणुकांना स्थगिती देत त्या २० डिसेंबरला घेण्याचे आदेश काढले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्वच जागांची मतमोजणी ही २१ डिसेंबरला करण्याचा निर्णय दिला आहे.

Postponing elections is wrong, Election Commission's mismanagement: Praful Patel
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : निवडणूक आयोगाने राज्यातील काही ठिकाणच्या नगरपरिषद आणि नगपंचायत निवडणुकांना स्थगिती देत त्या २० डिसेंबरला घेण्याचे आदेश काढले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्वच जागांची मतमोजणी ही २१ डिसेंबरला करण्याचा निर्णय दिला आहे. यात संपूर्ण चूक ही निवडणूक आयोगाची आहे. निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
खा. प्रफुल्ल पटेल हे मंगळवारी (दि.२) गोंदिया नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाच्या हक्क बजावण्याकरिता आले आले होते. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मतदान सर्वांना लोकशाहीमध्ये मिळालेला अधिकार आहे. सामान्य नागरिकांनीसुद्धा आपला मतदान हक्काचा अवश्य वापर करावा.