गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील प्रवासी गाड्या तीन दिवस रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:21 IST2025-01-09T16:17:25+5:302025-01-09T16:21:40+5:30

प्रवाशांना बसणार फटका : नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू

Passenger trains on Gondia-Chandafort route cancelled for three days | गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील प्रवासी गाड्या तीन दिवस रद्द

Passenger trains on Gondia-Chandafort route cancelled for three days

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळअंतर्गत गोंदिया-हिरडामाली, नागभीड-तलोदी रोड आणि ब्रह्मपुरी- नागभीड रेल्वे स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात आहे. त्यामुळे गोंदिया-चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांचे संचलन गुरुवार, ९ ते रविवार, १२ जानेवारीदरम्यान बंद करण्यात आले.


यात बल्लारशा-गोंदिया, १० जानेवारीला गोंदिया- वडसा, ९ आणि १० जानेवारी रोजी चांदाफोर्ट-जबलपूर आणि जबलपूर-चांदाफोर्ट, ९, १० आणि ११ जानेवारी रोजी, गोंदिया- बल्लारशा, ११ जानेवारी रोजी, गोंदिया-बल्लारशा आणि गोंदिया- बल्लारशा आणि ११ जानेवारी रोजी चांदाफोर्ट-गोंदिया आणि वडसा- चांदाफोर्ट या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ९ जानेवारी रोजी हैदराबादहून धावणारी गाडी क्रमांक हैदराबाद-रक्सोल एक्स्प्रेस ही बदललेल्या बल्लारशा-नागपूर-गोंदिया मार्गाने धावणार, तसेच १० जानेवारी रोजी दरबंगा येथून सुटणार दरबंगा सिकंदराबाद ही गोंदिया-नागपूर बल्लारशाकडे वळविण्यात आली आहे. १० जानेवारीला यशवंतपूरवरून सुटणारी यशवंतपूर-कोरबा (कोरबा एक्स्प्रेस) ही पण बल्लारशा नागपूर- गोंदिया मार्गे वळवण्यात आली आहे. 


इतवारी-रीवा-इतवारी एक्स्प्रेस ३० मार्चपर्यंत रद्द
नागपूर-छिदवाडा मार्गावरील रेल्वे पुलाशी संबंधित काम सुरू असून, त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील भीमलगोंडी भंडारकुंड रेल्वे सेक्शनवरील रेल्वे वाहतूक सध्या ठप्प आहे. या रेल्वे विभागावरील पुलाचे काम सुरु आहे. वरील विभागावर सुरू असलेल्या बांधकामामुळे, रीवा-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्स्प्रेस ही ३० मार्च २०२५ पर्यंत रद्द राहील व नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रीवा एक्स्प्रेस ही गाडी ३१ मार्च २०२५ पर्यंत रद्द. नागपूर-शहडोल एक्स्प्रेस ३१ मार्च २०२५ पर्यंत नागपूर येथून सुटणारी नागपूर-शहडोल एक्स्प्रेस ही व्हाया नागपूर-आमला-छिंदवाडा मार्गावरून जाणार तसेच १ एप्रिल २०२५ पर्यंत शहडोल येथून सुटणारी गाडी शहडोल-नागपूर एक्स्प्रेस ही छिंदवाडा-आमला- नागपूर मार्गावरून सुरू राहणार असल्याची माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक यांनी दिली आहे.

Web Title: Passenger trains on Gondia-Chandafort route cancelled for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.