श्वानाला वाचविण्याच्या नादात कारला अपघात; भावाचा मृत्यू, बहीण गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2022 14:32 IST2022-10-27T14:30:51+5:302022-10-27T14:32:57+5:30
आमगाव तालुक्यातील पदमपूरजवळील घटना

श्वानाला वाचविण्याच्या नादात कारला अपघात; भावाचा मृत्यू, बहीण गंभीर
गोंदिया : आमगाव तालुक्यातील पदमपूर येथील सदाशिव थेर यांच्या घरासमोर श्वानाला वाचविण्याच्या नादात कार रस्त्याच्या दुभाजकाला आदळल्याने कारचालक भावाचा मृत्यू तर बहिणी गंभीर जखमी झाली. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजतादरम्यान घडली.
संतोष रमेश गाढवे (५०) रा. देवरी यांचा मृत्यू झाला. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता आपल्या बहिणीला बनगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सोडून देत असताना पदमपूर येथील सदाशिव थेर यांच्या घरासमोर श्वान आडवा आला. त्या श्वानाला वाचविण्याच्या नादात कार रस्त्यालगत असलेल्या कठड्यावर आदळली.
या घटनेत चालकाचा गोंदियाच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तर, बहीण गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस नायक नितीन रहांगडाले यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास महिला पोलीस हवालदार उईके करीत आहेत.