Lok Sabha Election 2019; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात प्रचार रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:08 IST2019-04-03T23:53:21+5:302019-04-04T13:08:56+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.२) शहरातील प्रभाग क्रमांक ११,१२ व ३ आणि ४ मध्ये माजी आ. राजेंद्र जैन, प्रफुल अग्रवाल, अशोक गुप्ता व नगरसेवकांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.

Lok Sabha Election 2019; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची शहरात प्रचार रॅली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.२) शहरातील प्रभाग क्रमांक ११,१२ व ३ आणि ४ मध्ये माजी आ. राजेंद्र जैन, प्रफुल अग्रवाल, अशोक गुप्ता व नगरसेवकांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली.
रॅलीला संबोधित करताना राजेंद्र जैन यांनी भाजप सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. सरकारच्या जनहित विरोधी धोरणामुळे जनतेमध्ये तिव्र नाराजी आहे. विकासाचे आश्वासन देत सत्तेवर आलेले भाजप सरकार आता विविध विकासात्मक योजनांच्या निधीत कपात करीत आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात मागील पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारने एकही विकासात्मक काम केले नाही. परिणामी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. त्यामुळे येत्या ११ तारखेला सजग राहून विकास विरोधी सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. आघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून या क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यास सांगितले. रॅलीत नरेश माहेश्वरी, अशोक चौधरी, देवेंद्रनाथ चौबे, सतीश देशमुख, नानु मुदलियार, जयंत कछवाह, दीपकभाई पटेल, विनायक खैरे, मयुर दरबार, चिकू अग्रवाल, खलील पठान, जग्गु वासनिक, संदीप पटले, रमन उके, नाजूक शेंडे, त्रिलोक तुरकर आदी सहभागी झाले होते.