आयटीआयमधून शिका एआय, ड्रोन टेक्नॉलॉजी : 'आयटीआय'मध्ये मुलींसाठी हे खास कोर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 19:43 IST2025-07-21T19:42:37+5:302025-07-21T19:43:42+5:30

एआय शिकणाऱ्याचे नशीब चमकणार : मुलींचा ओढा अभियांत्रिकीकडे

Learn AI, Drone Technology from ITI: These special courses for girls in 'ITI' | आयटीआयमधून शिका एआय, ड्रोन टेक्नॉलॉजी : 'आयटीआय'मध्ये मुलींसाठी हे खास कोर्स

Learn AI, Drone Technology from ITI: These special courses for girls in 'ITI'

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :
राज्यात खास महिलांसाठी आयटीआय सुरू करण्यात आले आहे. पाच वर्षांची आकडेवारी पाहता, आयटीआयकडे मुलींचा ओढा वाढल्याचे चित्र आहे. त्यातही, अभियांत्रिकीशी संबंधित अभ्यासक्रमांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. जिल्ह्यात यंदा एकूण पहिल्या फेरीत ४५ टक्के जागांवर आयटीआयचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यातील एअरोनॉटिकल, संगणक व इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कोर्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त वाढल्याचे दिसून येत आहे.


'आयटीआय'मध्ये मुलींसाठी हे खास कोर्स
फिटर, मोटर मेकॅनिक्सपासून इन्फार्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नालॉजी, सिस्टीम मेंटनन्स, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स, ड्राप्समन सिव्हिल, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल कन्झ्युमर इलेक्ट्रानिक्स अप्लायन्सेस, कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्क मेंटेनन्स, कॉम्प्युटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टन्स, सेक्रेटेरियन प्रॅक्टिसेस, कॉस्मेटोलॉजीस्ट, ड्रेस मेकिंग, फूड्स अॅण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या कोर्सेसमध्ये मुलींचा टक्का वाढला आहे.


'आयटीआय'ने कात टाकली; पाच वर्षांत हे महत्त्वाचे बदल
गेल्या पाच वर्षांत आयटीआयमध्ये मोठे बदल झाले आहेत. केंद्राची स्ट्राइव्ह योजना आणि सार्वजनिक खासगी भागिदारीतून (पीपीपी) आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. नामांकित कंपन्यांशी सामंजस्य करार करून ऑन जॉब ट्रेनिंग, प्रत्यक्ष कारखान्यात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होत आहे. आयटीआयमध्ये कंपन्यांनी मुलाखती सुरू केल्या आहेत. नव्या प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम यांसारख्या सुविधा उपलब्ध झाल्या असून, मुलींचा ओढा वाढला आहे. 


मुलींनाही आयटीआय करायचं; मोठं पॅकेज कमवायचंय
आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या मुलीना संस्थेमध्ये कंपनीत कसे काम करावे याचे अवेअरनेस ट्रेनिंग दिले जाते. त्यामुळे आयटीआयच्या प्रत्येक अभ्यासक्रमात मुलांसोबत मुलींचा सहभाग वाढला आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगले पॅकेज मिळत आहे. 


'ई-व्हेईकल्स' सह इतर नवे अभ्यासक्रम लवकरच
आयटीआयमध्ये भविष्यात ड्रोन टेक्नीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मोटर व्हेईकल, रोबोटिक्स, आयओटी स्मार्ट हेल्थकेअर, सीएनसी प्रोग्राम्स, सोलर टेक्निशियन अशा नव्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यासाठी तयारी सुरू आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल्सची वाढती मागणी लक्षात घेता 'ई-व्हेईकल्स' सारख्या कोर्सची मागणी वाढली आहे.


पहिल्या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश?
आयटीआय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या फेरीअंती जिल्ह्यातील ४५ टक्के प्रवेश झाले आहेत. यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.


१०० टक्के गुण मिळवणाऱ्यांचाही आयटीआयला अर्ज
रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून झटपट रोजगार देण्याची संधी वाढल्याने आयटीआयकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. दहावीमध्ये २० ते १०० टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही अर्ज आयटीआयसाठी येत आहेत.


"महिला कर्मचाऱ्यांची कामाप्रतीची दृढ संकल्पना, चिकाटी, सातत्य, नवे तंत्रज्ञान चटकन शिकून घेण्याची आवड, स्थिर मानसिकता अशा विविध पैलूंमुळे गेल्या पाच वर्षांत उत्पादन व सेवा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मुलींना पसंती दिली जाते. रोजगार वाढल्याने मुलींचा आयटीआयकडे कल वाढला आहे. प्रवेशप्रक्रिया सुरू असून, मुलींनी रोजगाराभिमुख व स्वयंरोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करून मोठ्या संख्येने प्रवेश घ्यावा."
- बी. एन. तुमडाम, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गोंदिया

Web Title: Learn AI, Drone Technology from ITI: These special courses for girls in 'ITI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.