घरातून २८ हजार रुपयांचे दागिने लंपास; गोंदिया जिल्ह्यातील घटना 

By नरेश रहिले | Updated: October 29, 2023 17:16 IST2023-10-29T17:15:50+5:302023-10-29T17:16:04+5:30

केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या करांडली गावातील रहिवासी हर्षलू दीपक शहारे (३५) यांच्या घरातील लाकडी आलमारीतून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

Jewelery worth Rs 28,000 looted from the house Incident in Gondia district | घरातून २८ हजार रुपयांचे दागिने लंपास; गोंदिया जिल्ह्यातील घटना 

घरातून २८ हजार रुपयांचे दागिने लंपास; गोंदिया जिल्ह्यातील घटना 

गोंदिया : केशोरी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या करांडली गावातील रहिवासी हर्षलू दीपक शहारे (३५) यांच्या घरातील लाकडी आलमारीतून २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे एक मंगळसूत्र (किंमत १० हजार रुपये), ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत ११ हजार रुपये), अडीच ग्रॅम वजनाची सोन्याची एक नथ (किंमत सात हजार रुपये) यांचा समावेश आहे. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत हर्षलू शहारे यांच्या तक्रारीवरून केशोरी पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार उदेभान इंदूरकर करीत आहेत.

Web Title: Jewelery worth Rs 28,000 looted from the house Incident in Gondia district