अन् युवकाला केली झाडाला बांधून मारहाण

By कपिल केकत | Updated: December 4, 2023 17:14 IST2023-12-04T17:13:05+5:302023-12-04T17:14:07+5:30

मोहाटोला येथील प्रकार, जमिनीचा जुना वाद, तिघा बाप-लेकांवर गुन्हा दाखल.

in gondia tied the youth to a tree and beat him police case has been registred | अन् युवकाला केली झाडाला बांधून मारहाण

अन् युवकाला केली झाडाला बांधून मारहाण

गोंदिया : जमिनीच्या जुन्या वादातून तिघा बाप-लेकांनी युवकाला झाडाला बांधून मारहाण केली. एखाद्या चित्रपटातील दृश्य असावे असा हा प्रकार सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम मोहाटोला-कावराबांध येथे शनिवारी (दि.२) सायंकाळी ७:३० वाजता दरम्यान घडला.

फिर्यादी नेतलाल बंशिलाल दमाहे (४६, रा. मोहाटोला) व आरोपी चंदनलाल राधेलाल दमाहे (६०), रमेश चंदनलाल दमाहे (३५) व दिनेश चंदनलाल दमाहे (३६,रा.मोहाटोला) हे शेजारीच राहतात. शनिवारी (दि.२) सायंकाळी ७:३० वाजेदरम्यान तिघा आरोपी बाप-लेकांनी नेतलाल यांना जमिनीच्या जुन्या वादातून घरातून खेचून बाहेर काढले व बांधीत नेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर आरोपींच्या घराच्या अंगणात असलेल्या झाडाला बांधून मारहाण केली. यावर फिर्यादी नेतलाल जोरजोरात ओरडून लागले असता त्यांची पत्नी व मुलगी त्यांना वाचविण्यासाठी धावून आल्या. मात्र आरोपींनी त्यांनासुद्धा मारहाण केल्याने त्यांनी पोलिस पाटील व इतर लोकांना बोलावून हा प्रकार दाखविला. गावातील लोकांनी नेतलाल याला कशाला मारहाण करता असे विचारल्यावर आरोपींनी त्याला सोडले. याप्रकरणी नेतलाल दमाहे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम ३४२, ३२३, ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

Web Title: in gondia tied the youth to a tree and beat him police case has been registred