बनावट पीक विमा अर्ज कराल तर आधार कार्ड ब्लॉक होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:57 IST2025-01-24T16:56:37+5:302025-01-24T16:57:12+5:30
Gondia : गोंदिया जिल्ह्यात एकही बनावट अर्जाची तक्रार नाही

If you apply for fake crop insurance, your Aadhaar card will be blocked!
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पीक विम्यात भ्रष्टाचार झाल्याने एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर उपाय म्हणून बनावट पीक विम्याचा अर्ज निदर्शनास आल्यास कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळू नये म्हणून डीबीटी पोर्टलवर संबंधिताचा आधार क्रमांक ब्लॉक करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे पीक। विम्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी मदत मिळणार आहे.
बनावट पीकविमा काढून शासनाची फसवणूक करण्यात आलेली आहे. मराठवाड्यामध्ये पीकविमा घोटाळ्याची व्याप्ती जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यात मात्र बनावट पीक विम्याचे प्रकरण अद्याप पुढे आलेले नाही.
चांगल्या योजनेत पडला मिठाचा खडा
- १ एक रुपयात पीकविमा शासनाने शेतकऱ्यांना लागू केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत होता.
- काही जणांनी बनावट पीकविमा काढून त्याचा लाभ घेतला आहे. यावरून बनावट पीकविमा प्रकरण बाहेर आले आहे. त्यामुळे चांगल्या योजनेत मिठाचा खडा पडला आहे.
खरिपात किती बोगस अर्ज आढळले?
गोंदिया जिल्ह्यात १ लाख ७ हजार शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा काढला होता. खरिपात जिल्ह्यातील एकही शेतकऱ्याने बोगस अर्ज सापडलेला नाही.
प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे
बनावट पीक विम्याचा अर्ज निदर्शनास आल्यास कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळू नये म्हणून डीबीटी पोर्टलवर संबंधिताचा आधार क्रमांक ब्लॉक करण्याचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. अद्याप गोंदिया जिल्ह्याचा अहवाल आलेला नाही.
१००० शेतकऱ्यांनी केला विमा
शेतकऱ्यांनी या वर्षी एक रुपयात पीक विम्यासाठी गोंदियामधून नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी ही संख्या यापेक्षा जास्त होती.
"गोंदिया जिल्ह्यात पीकविमा घोटाळा झालेला नाही. शेतकऱ्याचे पीक क्षेत्र तपासणी सध्या सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर खरी परिस्थिती कळेल."
- नितीन उईके, कृषी कार्यालय गोंदिया.