ह्रदयद्रावक... नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 22:28 IST2022-11-08T22:27:21+5:302022-11-08T22:28:59+5:30

नवोदय विद्यालयातील संगम बोपचे हा विद्यार्थी विद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मित्रांसोबत फुटबॉल खेळत होता

Heartbreaking... Navodaya Vidyalaya student dies while playing football in gondia | ह्रदयद्रावक... नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू

ह्रदयद्रावक... नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू

गोंदिया - अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळतांना भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.८) सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. संगम खीलेश्वर बोपचे (११) रा.सोनी,ता.गोरेगाव, जिल्हा गोंदिया असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील संगम बोपचे हा विद्यार्थी विद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मित्रांसोबत फुटबॉल खेळत होता. दरम्यान तो भोवळ येऊन पडला. त्याला लगेच विद्यालयातील शिक्षकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगावबांध येथे नेले. तेथे तपासणी करुन त्याला साकोली येथील हृदयरोग तज्ज्ञांकडे दाखल करण्यात आले. मात्र तिथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याला नवोदय विद्यालय नवेगावबांधचे प्राचार्य थूल यांनी लोकमतशी बोलतांना दुजोरा दिला.

Web Title: Heartbreaking... Navodaya Vidyalaya student dies while playing football in gondia