गोरेगाव तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना मधमाश्यांचा हल्ला

By नरेश रहिले | Updated: October 1, 2023 19:54 IST2023-10-01T19:54:10+5:302023-10-01T19:54:43+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

five farmers in goregaon taluka were attacked by bees in gondia | गोरेगाव तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना मधमाश्यांचा हल्ला

गोरेगाव तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना मधमाश्यांचा हल्ला

नरेश रहिले, गोंदिया: गोरेगाव तालुक्यात तीन ठिकाणी मधमाश्यांनी हल्ला चढविल्याने पाच जणांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

तिल्ली मोहगाव येथील निलवंता जोशीराम मेश्राम (५१), मिरन गणपत कोल्हे (४०) व मनिषा विजय कोल्हे (३०) सर्व रा. तिल्ली मोहगाव ह्या १ ऑक्टोबर रोजी जंगलात गेल्याने त्यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला चढविला. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दुसरी घटना १ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. गोरेगाव तालुक्याच्या साेनी येथील घनश्याम बैरागी घारपिंडे (५२) यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. तिसरी घटना ३० सप्टेंबर रोजी पुरगाव येथे घडली. शेतात काम करणारा शेतकरी भाऊलाल हिरालाल रहांगडाले (६५) यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्या पाचही जणांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.

Web Title: five farmers in goregaon taluka were attacked by bees in gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.