माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार 

By अंकुश गुंडावार | Updated: January 11, 2024 13:58 IST2024-01-11T13:57:52+5:302024-01-11T13:58:06+5:30

लोकेश कल्लू यादव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांचे भाऊ आहेत.

Firing on former corporator Lokesh Yadav | माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार 

माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार 

गोंदिया : नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते लोकेश कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. 11) सकाळी तीन अनोळखी व्यक्तींनी हेमू कॉलनीजवळ यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ते जखमी झाले.

हल्ल्यात यादव यांच्या कंबरेला गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झाल्याने त्यांच्यावर केटीएस रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने नागपूर येथील इस्पितळात हलविण्यात आलेत. लोकेश कल्लू यादव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांचे भाऊ आहेत. गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
 

Web Title: Firing on former corporator Lokesh Yadav