इंस्टावर मैत्रीनंतर प्रेमात ओढले; लैंगिक छळ करून युट्यूबवर व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 15:34 IST2024-07-15T15:33:12+5:302024-07-15T15:34:04+5:30
गोंदियातील २२ वर्षाच्या तरूणावर गुन्हा दाखल: पैश्यावरून झाला दोघांत वाद प्रकरण पोहचले पोलीस ठाण्यात

Drawn to love after friendship on Insta; A video of sexual harassment goes viral on YouTube
नरेश रहिले
गोंदिया: सोशल मिडीयाचा सहजर गैरवापर होऊ लागला. फेसबूक, स्नॅपचॉट, इंस्टाग्राम चालवितांना कधी कुणाच्या प्रेमात अडकतील याचा नेम नाही. गोंदियातील एका १७ वर्षाच्या मुलीशी इंस्टाग्रामवरा मैत्री करून चर्चेतूनच त्यांचे प्रेमात रूपांतर झाले. या प्रेमप्रकरणातून मुलीचा लैंगीक छळ करून तिचे व्हिडीओ युट्यूवर व्हायरल करण्यात आले. यासंदर्भात गोंदियातील एका तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला.
गोंदियातील आपल्या आजीकडे लहानपणापासून राहणारी १७ वर्षाची पिडीत ही महिभाभरापूर्वी नागपूर येथे राहायला गेली. गोंदियात आपल्या आजीकडे असतांना त्या मुलीच्या आयडीवर आरोपी दैनिक शेळके (२२) रा. सुंदरनगर गोंदिया याने इंस्ट्राग्राम आयडीवर त्याने फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याची फ्रेंड रिक्वेस्ट तिने स्विकारली. त्या दोघांची इंस्टाग्रामवरच चांगलीच मैत्री झाली. पाहता-पाहता दोघांचे मैत्रीतून प्रेमात रूपांतर झाले. यातूनच त्या दोघांत शारीरीक संबध प्रस्तापीत झाले. त्याने त्या मुलीचे अनेकदा शारीरीक शोषण झाले. त्या दोघांची आक्षेपार्ह व्हीडीओ काढून दैनिक शेळके याने युट्यूबवर प्रसारीत करून तिची बदनामी केली. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३७६ (२) (एन) ३२३, ५०४, ५०६, सहकलम ४, ६, ८, १२ बाललैंगीक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड करीत आहेत.
लाल बंगल्यात केला अत्याचार
आरोपी दैनिक शेळके याने त्या १७ वर्षाच्या मुलीला १ मार्च २०२४ ला संदुर नगरच्या चौकी येथे बालावल्यानंतर तिला सुंदरनगरातील लाल बंगल्यात घेऊन गेला. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर अत्याचार केला.
पैश्यावरून झाला वाद
५ जुलै २०२४ रोजी दैनिक शेळके याने तिला कुडवा परिसरातील डॉमीनोजच्या समोरील एका घरी तिला बोलाविले. त्या दोघांचे पैश्यावरून तिथे वाद झाला. तिला पैसे हवे होते. परंतु त्याने तिला पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. परिणामी त्याने तिला शिविगाळ करीत मारहाण केली. या वादातून संतापलेल्या दैनिक शेळके याने तिच्यासोबत आक्षेपार्ह काढून ठेवलेले व्हीडीओ युट्यूबवर व्हायरल केले. परिणामी प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.
शिक्षणासाठी महिनाभरापासून ती बाहेर
शिक्षण घेण्यासाठी ती महिनाभरापासून नागपूर येथे गेल्याने या दोघांमध्ये वाद सुरू झाला. ती त्याला पैसे मागत होती. पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातूनच प्रकरण गुन्हे दाखल करण्यापर्यंत पोहचले.
एक वर्षापासून होते प्रेम प्रकरण
त्या दोघांचे एक वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेमप्रकरणातूनच लैंगीक शोषण झाले. या प्रकरणात आरोपी दैनिक शेळके याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी तुरूंगात केली आहे.
नागपूरच्या बर्डी पोलीसांकडून गुन्हा वर्ग करण्यात आला
गोंदियाच्या कुडवा परिसरातील डॉमीनोजच्या समोरील एका घरी तिला मारहाण करण्यात आली. आरोपी दैनिक शेळके याने तिला मारहाण केल्यानंतर ती नागपूरला गेली. तिने बर्डी पोलिसात केलेल्या तक्रारीनुसरा गुन्हा गोंदिया शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.