रिकाम्यापोटी चहा घेऊ नका, वाढतो प्रोस्टेट कॅन्सरचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:36 IST2025-02-21T15:35:39+5:302025-02-21T15:36:09+5:30
Gondia : चहाची मात्रा आणि वेळेचे नियंत्रण आवश्यक

Don't drink tea on an empty stomach, it increases the risk of prostate cancer
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आजकाल चहा पिण्याची आवड सर्वामध्ये आहे. काही लोक दिवसाला आठ-आठ कप चहा पितात, पण रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, उपाशीपोटी चहा पिण्याने दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. चहा पिण्याआधी काही हलके आणि पौष्टिक अन्न घेणे आवश्यक आहे. असे केल्यास चहा पिण्याचे शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम टाळता येऊ शकतात. त्यासाठी दररोज चहा पिण्याची मात्रा आणि वेळेचे नियंत्रण करणेदेखील महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
प्रोस्टेट कॅन्सरचा धोका
विशेषतः, पुरुषांना रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. या सवयीचा निरंतर परिणाम पचनशक्तीवर होतो. शरीरातील इतर अवयवांवर होऊन गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरसारखा आजार होण्याची शक्यता निर्माण होते.
हे काय ! दिवसाला आठ-आठ कप चहा !
खूप चहा पिण्याची सवय शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते. काही लोक दिवसाला आठ-आठ कप चहा पितात, ज्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. विशेषतः, रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
हाडांचे नुकसान, अल्सरचा धोका
हाडांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर परिणामदेखील दिसून येतात. याशिवाय, अल्सर होण्याचा धोकादेखील वाढतो.
छाती, पोटात जळजळ; चिडचिडेपणा !
चहामुळे पोट आणि छातीमध्ये जळजळ होऊ शकते. ही जळजळ तात्पुरती असू शकते. थकवा आणि ताण यामुळे मूड स्विंग्सदेखील होऊ शकतात. चिडचिडेपणा आणि मानसिक ताणदेखील वाढतो.
रिकाम्यापोटी चहाने अॅसिड पातळीत वाढ
रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे शरीरात अॅसिड पातळी वाढते. दीर्घकाळापर्यंत ही सवय शरीराला गंभीर समस्या निर्माण करू शकते
"चहात कॅफीन आणि टॅनीन हे घटक असतात. पचनसंस्थेवर दुष्परिणाम होतात. अॅसिडिटी आणि गॅसची समस्या वाढते. प्रोस्टेट कॅन्सरचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे नाश्ता केल्यानंतर चहा घ्यावा. शक्यतोवर दिवसातून एकच चहा घ्यावा."
-डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी