डॉक्टरांनी नोंदविला कोलकाता येथील घटनेचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:28 IST2024-08-17T15:27:29+5:302024-08-17T15:28:35+5:30
दोषींवर कठोर कारवाईची मागणी : जिल्हाभरातून व्यक्त केला जातोय संताप

Doctors protested against the incident in Kolkata
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कोलकाता येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टर संपावर असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी कोलकत्ता घटनेचा निषेध केला आहे. जिल्हा परिषद येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात निषेध सभा घेऊन कोलकत्ता घटनेचा निषेध करण्यात आला.
त्याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, गोंदिया तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे, तिरोडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दर्शना नंदागवळी, अर्जुनी मोरगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुकन्या कांबळे, सडक अर्जुनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रणीत पाटील, सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्निल आत्राम, कुष्ठरोग विभागाचे डॉ. भाग्यश्री गावंडे, जिल्हा क्षयरोग विभागाचे डॉ. देव चांदेवर उपस्थित होते. शुक्रवारी (दि.१६) जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी ओपीडी बाह्यरुग्ण सेवेदरम्यान काळी फिती लावून रुग्ण सेवा प्रदान करण्यात येत असल्याचे सांगितले.
आंदोलनात विविध संघटनांचा सहभाग
जिल्हा मॅग्मो संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन व जिल्ह्यातील डॉक्टरांनीदेखील याबाबत आक्रमक पवित्रा धारण केला असून, या प्रकरणातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. कोलकाता येथील डॉक्टरच्या हत्येनंतर आयएमए व मॅग्मो यांनी म्हटलं की, रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्या- सोबतच केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करावा. तसेच रुग्णा- लयांमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करावी. रुग्णाल- यांमध्ये काम करणारे डॉक्टर, स्टाफ नर्स, परिचारिकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.