जबलपूर-रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला सालेकसा येथे थांबा देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 18:51 IST2025-06-17T18:50:39+5:302025-06-17T18:51:13+5:30
सालेकसावासीयांची मागणी : पटेल यांना दिले निवेदन

Demand for stopping at Saleksha for Jabalpur-Raipur Intercity Express
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : मागील दहा वर्षांपासून सालेकसा येथे इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा याकरिता सालेकसा तालुक्यातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी व रेल्वे मंत्रालयाला निवेदन दिले. पण ती मागणी अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. आता जबलपूर-रायपूर नवीन इंटरसिटी एक्स्प्रेस गोंदिया मार्गे सुरू करण्यात येत आहे. या गाडीला सालेकसा येथे थांबा देण्यात यावा यासाठी सालेकसा येथील नागरिकांनी सोमवारी (दि.१६) खा. प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन निवेदन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तालुका शाखेच्यावतीने खा. प्रफुल्ल पटेल यांची सोमवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेण्यात आली. तसेच जबलपूर-रायपूर या नवीन इंटरसिटी एक्स्प्रेसला सालेकसा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच सालेकसा रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक १२८५५/१२८५६ इतवारी-बिलासपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा देण्याची घोषणा आली. पण अद्यापही थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, जबलपूर-रायपूर इंटरसिटी एक्स्प्रेसचासुद्धा सालेकसा स्थानकावर देण्यात यावा अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून खा. पटेल यांच्याकडे करण्यात आली. या विषयावर आपण रेल्वेमंत्री व रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन खा. पटेल यांनी शिष्टमंडळाला दिले.
चर्चेवेळी हे होते उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व माजी आ. राजेंद्र जैन, माजी मंत्री तथा आ. राजकुमार बडोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सालेकसा तालुकाध्यक्ष अध्यक्ष डॉ. अजय उमाटे, शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, युवक तालुका अध्यक्ष बाजीराव तरोणे, संतोष नागपुरे, संदीप मिश्रा उपस्थित होते.