दाक्षिणात्य अभिनेता देवरकोंडाविरुद्ध सिरोंचा पोलिस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 15:40 IST2025-06-27T15:39:40+5:302025-06-27T15:40:31+5:30
संघटना आक्रमक : आदिवासी समूहाबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप

Complaint filed against South actor Deverakonda at Sironcha police station
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता विजय देवरकोंडा हा आदिवासी समूहाबद्दलच्या वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्याविरुद्ध सिरोंचा ठाण्यात २६ जून रोजी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली. एप्रिलमधील पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने आदिवासी समूहाबद्दल वादग्रस्त विधान करून भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
येथील नगरसेवक सतीश भोगे यांनी यासंदर्भात सिरोंचा ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. उपअधीक्षक संदेश नाईक व पो. नि. समाधान चव्हाण यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले. विजय देवरकोंडाविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवावा, अशी मागणी नगरसेवक सतीश भोगे यांनी केली. यावेळी रवी सुलतान, शंकर बंदेला, सुरेश गादम आदींची उपस्थिती होती.
"तक्रार आली आहे, याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने काय कारवाई करायची याचा निर्णय वरिष्ठांना विचारून घेण्यात येईल."
- समाधान चव्हाण, पो. नि. सिरोंचा