एकतर्फी प्रेमातून 'त्या' महिलेचा निर्घृण खून; देवरीतील घटना, आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2022 17:09 IST2022-08-29T17:04:29+5:302022-08-29T17:09:03+5:30
आरोपीला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

एकतर्फी प्रेमातून 'त्या' महिलेचा निर्घृण खून; देवरीतील घटना, आरोपी अटकेत
देवरी (गाेंदिया) : पंचशील चौकाजवळील घरडे यांच्या निवासस्थानी किरायाने राहणाऱ्या महिलेचा १७ ऑगस्ट रोजी खून झाला होता. तब्बल आठ दिवसानंतर देवरी पोलिसांनी पंचशील चौकात राहणाऱ्या एका आरोपीला अटक केली. २५ ऑगस्टपर्यंत पोलीस काेठडी देण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून हे खून प्रकरण घडल्याचा निष्कर्ष देवरी पाेलिसांनी काढला आहे.
शिशूकला मेघनाथ साखरे (४०) या महिलेचा अज्ञात व्यक्तीनी गळा चिरुन खून केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथक व फिंगरप्रिंट एक्सपर्टला पाचारण केले. त्यांनीसुद्धा संपूर्ण चौकशी केली. परंतु आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले नव्हते. गुन्हे अन्वेषण शाखा व देवरी पोलिसांनी महिलेच्या मोबाईलची पडताळणी करीत तिच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांची कसून चौकशी केली. शेवटी १७ ऑगस्टला शिशूकलाला एका व्यक्तीने फोन केला होता. परंतु शिशूकलाने त्याचा फोन उचलला नाही. सर्व तांत्रिक बाबींची चौकशी करीत पोलिसांनी शेवटी आरोपीला एकतर्फी प्रेम प्रकरणातून गुन्हेगार ठरवीत अटक केली.
शिशूकला खून प्रकरणातील सर्व पुराव्यांची चौकशी केली असता व सर्व तांत्रिक बाबी पडताळल्यानंतर आरोपींचे मोबाईल लोकेशन घटनास्थळाजवळ दाखवित असल्याने पोलिसांनी त्याला आरोपी बनविले आहे. निर्दोषांवर पोलीस कारवाई करीत नाही. चौकशीदरम्यान आरोपी हा नेहमी खोटे बोलत होता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला आहे. करीता त्याला आरोपी करण्यात आले असून, घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय चिळे यांच्याकडे असून, ते घटनेचा तपास करीत आहेत.
- रेवचंद सिंगनजुडे, पोलीस निरीक्षक, देवरी.