ब्रेक फेल... आणि लालघाटीत भीषण अपघात! रोजगार सेवकाचा मृत्यू, तिघे जखमी

By अंकुश गुंडावार | Updated: August 2, 2025 16:15 IST2025-08-02T16:14:36+5:302025-08-02T16:15:03+5:30

तीन जण जखमी : सालेकसा-दरेकसा मार्गावरील घटना; ब्रेक फेल झाल्याने घडली घटना

Brake failure... and a terrible accident in Lalghati! Employment worker dies, three injured | ब्रेक फेल... आणि लालघाटीत भीषण अपघात! रोजगार सेवकाचा मृत्यू, तिघे जखमी

Brake failure... and a terrible accident in Lalghati! Employment worker dies, three injured

दरेकसा : खत आणण्यासाठी टाटा सुमोने जात असताना ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने लालघाटीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला धडक दिली. यात एकजण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २) सकाळी १० वाजेच्या सुमारास सालेकसा-दरेकसा मार्गावर घडली.

सरोज सोहन कमरे (३२, रा. टेकाटोला दंडारी) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे, तर मनोज मदन कमरे (२५), रोहित श्यामलाल कमरे (१८) आणि आर्यन श्यामलाल कमरे (१५) असे अपघातात जखमी झालेल्यांची नाव आहे. प्राप्त माहितीनुसार शनिवारी सकाळी सालेकसा तालुक्यातील टेकाटोला येथून सरोज कमरे, मनोज कमरे, रोहित कमरे व आर्यन कमरे हे एकाच कुटुंबातील सदस्य टाटा सुमोने (क्र. एमएच ३५ पी ३६९३) लालघाटीमार्गे दरेकसा येथे खत खरेदीसाठी जात होते. दरम्यान, लालघाटीत वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टाटा सुमोने घाटातील संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिली. यात चालक सरोज कमरे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गाडीतील तीन जण जखमी झाले. या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका बोलावून अपघातातील जखमींना दरेकसा प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले. जखमीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ. खांडेकर यांनी सांगितले.

पाेलिसपाटील धावले मदतीला

लालघाटीजवळ अपघात झाल्याची माहिती मिळताच दरेकसा, जमाकुडो, टोयागोंदी येथील पोलिसपाटील लालचंद मचिया, साहेबदास बंबुले यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद सालेकसा पोलिसांनी घेतली आहे.

सरोज हा ग्रामरोजगावर सेवक म्हणून होता कार्यरत
अपघातात ठार झालेला टाटा सुमोचालक सरोज कमरे हा दरेकसा ग्रामपंचायत रोजगार सेवक म्हणून कार्यरत होता. त्याच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीयांवर संकट काेसळले आहे.

Web Title: Brake failure... and a terrible accident in Lalghati! Employment worker dies, three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.