किराणा दुकानातून २३ हजार चोरले, २४ तासांतच अटक ()
By नरेश रहिले | Updated: February 11, 2024 18:00 IST2024-02-11T18:00:27+5:302024-02-11T18:00:37+5:30
रावणवाडी पोलिसांची कारवाई : चोरीचे पैसे हस्तगत

किराणा दुकानातून २३ हजार चोरले, २४ तासांतच अटक ()
गोंदिया : रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सावरीटोला येथील अमृतलाल मनिलाल लिल्हारे (५४) यांच्या किराणा दुकानातून २१ हजार ९५० रूपये चोरणाऱ्या आरोपीला रावणवाडी पोलिसांनी उण्यापुऱ्या २४ तासांत अटक केली. रविकुमार गुलाब हिरापुरे (२७) रा. सावरीटोला असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
६ फेब्रुवारीच्या पहाटे आरोपीने दुकानाच्या खोलीत प्रवेश केला. दुकानाच्या आतील लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी काउंटरमधील प्लास्टिक डब्यात ठेवलेले रोख २१ हजार ९५० रूपये चोरून नेले होते. या संदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे रावणवाडीचे पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर, पोलिस हवालदार सुबोधकुमार बिसेन, अरविंदकुमार चौधरी, संजय चव्हाण, पोलिस शिपाई आशिष वैद्य, छगन विठ्ठले यांनी केली आहे.